एक्स्प्लोर

Shahrukh Khan Yash Raj Films Supreme Court : 'यशराज फिल्मस'ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;  एका गाण्यासाठी सुरू होता खटला, काय आहे प्रकरण?

Shahrukh Khan Yash Raj Films Supreme Court : शाहरुख खानच्या फॅन चित्रपटातील एका गाण्यावरून सुरू असलेल्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने यशराज फिल्मसला दिलासा दिला आहे.

Shahrukh Khan Yash Raj Films Supreme Court :  सुप्रीम कोर्टाने यशराज फिल्मसला (Yash Raj Films) मोठा दिलासा दिला आहे. सु्प्रीम कोर्टाने (Supreme Court) राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) दिलेल्या निकालाविरोधात यशराज फिल्मसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला.  न्या. पी.एस. नरसिंह आणि न्या. अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. 

'यशराज फिल्म'ने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले प्रकरण नेमकं काय?

यशराज फिल्मसने वर्ष 2021 मध्ये ष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेल्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान दिले होते. यशराज फिल्मने फॅन चित्रपटात जबरा  फॅन हे गाणे न ठेवल्याने ग्राहकाला 15 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. आफ्रिन झैदी यांनी ट्रेलरमध्ये हे गाणे पाहूनच सहकुटुंब हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सगळ्या चित्रपटात हे गाणंच दिसून आले नाही.

सुप्रीम कोर्टाने आदेशाला दिली होती स्थगिती

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना चित्रपट प्रमोशनमुळे ग्राहक आणि सेवा पुरवठादार यांच्यात काही संबंध आहेत का? एखादा प्रमोशनल कंटेट हटवल्यानंतर एखाद्याला नुकसानभरपाईचा अधिकार मिळेल का? या मुद्यांवर भर दिला. 

सुप्रीम कोर्टाने आदेशाला दिली होती स्थगिती

सप्टेंबर 2021 मध्ये, NCDRC च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या यशराज फिल्म्सच्या अपीलवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ आणि तक्रारदाराला नोटीस बजावून आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. व्यवसायाने शिक्षक असलेल्या ग्राहक आफरीन फातिमा झैदी यांनी ‘जबरा फॅन’ या गाण्याचा प्रोमो पाहिल्यानंतर ‘फॅन’ हा चित्रपट तिच्या कुटुंबासह पाहिला तेव्हा हे गाणे चित्रपटात नसल्याचे त्यांना समजले. 

तक्रारदारांची काय होती मागणी?

झैदी यांनी नुकसानभरपाईची मागणी करताना जबरा फॅन हे गाणे चित्रपटात नसल्याच्या डिसक्लेमरसह प्रोमो टेलिकास्ट करण्याची मागणी केली होती. तर, प्रोडक्शन हाऊसने सांगितले की, झैदी या ग्राहक नाहीत. त्याशिवाय, चित्रपट रिलीज होण्याआधीच हे गाणं चित्रपटात नसल्याची माहिती जाहीरपणे देण्यात आली होती. महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 2017 मध्ये झैदी यांच्या बाजूने निर्णय सुनावला. तर,  यशराज फिल्मसला तक्रारदार महिलेला नुकसानभरपाई म्हणून 10 हजार रुपये आणि खटल्यासाठी आलेल्या खर्चापोटी 5000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. 

NCDRC ने काय दिला होता आदेश?

महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेल्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली होती.  2020 मध्ये दिलेल्या निकालात, आयोगाने म्हटले की, टीव्ही वाहिन्यांवर व्यापकपणे दाखण्यात आलेल्या प्रोमोमध्ये गाण्याचा समावेश करणे,  मात्र त्याच वेळी चित्रपट रिलीज करताना त्या गाण्याला चित्रपटातून रद्द करणे हे चुकीचे आहे. या गाण्याला चित्रपटात स्थानच नव्हते तर प्रोमोमध्ये का दाखवण्यात आले, ही प्रेक्षकांनी फसवणूक असल्याचे राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget