Sunny Deol: मुंबईच्या रस्त्यावर नशेत फिरत होता सनी देओल? तारा सिंहनं स्वत:च सांगितलं व्हायरल व्हिडीओ मागील सत्य
Sunny Deol: सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो मुंबईच्या रत्यावर फिरत आहे.
Sunny Deol: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलसाठी (Sunny Deol) 2023 हे वर्ष खास ठरलं. कारण त्याचा गदर-2 (Gadar 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता सनीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो मुंबईच्या रत्यावर फिरत आहे.
मुंबईच्या रस्त्यावर नशेत फिरत होता सनी देओल? (Sunny Deol Viral Video)
सनी देओलच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, सनी हा एका रिक्षाला धडकतो. त्यानंतर तो रिक्षामधून रिक्षा चालवणारा उतरतो आणि सनीला रिक्षामध्ये बसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना असा प्रश्न पडला की, सनी हा मुंबईच्या रस्त्यावर नशेत फिरत होता का? तर आता नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला सनीनं उत्तर दिलं आहे. या व्हायरल व्हिडीओमागील सत्य सनीनं सांगितलं आहे.
It can be very dangerous! pic.twitter.com/heyinDQUKQ
— KRK (@kamaalrkhan) December 6, 2023
सनीनं सांगितलं व्हायरल व्हिडीओमागील सत्य
सनी देओलचा हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा त्याच्य 'सफर' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमधील आहे. आता स्वत: सनी देओलने याबद्दल माहिती दिली आहे. सनीनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तो शूटिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, "अफ़वाहों का 'सफ़र' बस यहीं तक"
Afwaahon ka ‘Safar’ bas yahin tak 🙏🙏#Shooting #BTS pic.twitter.com/MS6kSUAKzL
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2023
सनी देओलचे आगामी चित्रपट (Sunny Deol Upcoming Movies)
'घायल', 'दामिनी' आणि 'घातक' या सनीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याच्या गदर-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. गदर-2 या चित्रपटामध्ये सनसोबतच अमिषा पटेल,लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.सनीचा 'लाहोर- 1947' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली तसेच आता त्याच्या सफर या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या: