Digpal Lanjekar: सुभेदार चित्रपट रिलीज होताच दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, 'चित्रपटामधील क्लायमॅक्सचा....'
दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.
Digpal Lanjekar: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा 'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. सुभेदार हा चित्रपट रिलीज होताच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन प्रेक्षकांना एक विनंती केली आहे. त्यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी सुभेदार चित्रपट रिलीज झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर करुन प्रेक्षकांना या चित्रपटाचा क्लायमॅक्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर न शेअर करण्याची विनंती केली आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की दिग्पाल लांजेकर म्हणतात, 'तुम्हाला सुभेदार हा चित्रपट आवडत आहे याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे. आमचे प्रयत्न सफल होत आहेत, याचा देखील आम्हाला खूप आनंद होत आहे. पण आत्ताच चित्रपट रिलीज झाला आहे आणि असं लक्षात येत आहे की, या चित्रपटामधील क्लायमॅक्सचा भाग काही जण शूट करुन सोशल मीडियावर शेअर करत आहेत, मी तुमच्या भावना समजू शकतो की, तुम्हाला हे सगळं एकमेकांसोबत शेअर करायचं आहे. ही कलाकृती तुम्हाला सर्वांसोबत शेअर करायची आहे पण त्यामुळे ज्या लोकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायचा आहे, त्या लोकांना क्लायमॅक्समध्ये काही रस राहणार नाही. तुम्ही जो भक्तीचा निष्ठेचा अनुभव घेतला त्याचा अनुभव त्या लोकांना घेता येणार नाही.'
'मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की, कृपया क्लायमॅक्सचा भाग किंवा चित्रपटाचा इतर भाग शूट करु नका. तुम्ही मला सर्वजण साथ द्याल अशी आशा बाळगतो.' असंही दिग्पाल लांजेकर यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं.
View this post on Instagram
सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर चिन्मय मांडलेकर हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे.
‘सुभेदार’ या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ आणि 'मावळं जागं झालं रं...' ही दोन गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली.
संबंधित बातम्या