Subhedar : 'सुभेदार' चित्रपट झाला रिलीज; चाहत्यांचा थिएटरबाहेर जल्लोष, पोस्टरला केला दुधाचा अभिषेक, व्हिडीओ व्हायरल
Subhedar : सुभेदार चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला.
Subhedar : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या 'सुभेदार' (Subhedar) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटामधील गाणी आणि चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता सुभेदार चित्रपट हा काल (25 ऑगस्ट) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सुभेदार चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी थिएटरबाहेर जल्लोष केला. तसेच अनेकांनी थिएटरबाहेरील चित्रपटाच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक केला.
नुकताच अभिनेता चिन्मय मांडलेकरनं (Chinmay Mandlekar) एका खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पुण्यामधील काही थिएटरबाहेरील सुभेदार चित्रपटाच्या पोस्टरवर चाहते दुधाचा अभिषेक करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'केवळ आणि केवळ कृतज्ञता'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर चिन्मय मांडलेकर हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. मृणाल कुलकर्णी,विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, भूषण शिवतरे,आस्ताद काळे या कलाकारांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे.
सुभेदार चित्रपटामधील गाणी
‘सुभेदार’ या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ आणि 'मावळं जागं झालं रं...' ही दोन गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली आहे.
View this post on Instagram
सनी, द कश्मीर फाइल्स ,पावनखिंड, शेर शिवराज यांसारख्या चित्रपटांमधून चिन्मय प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामधील चिन्मयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता चिन्मयचा ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी फर्जंद (Farzand),फत्तेशिकस्त (Fatteshikas),पावनखिंड (Pawankhind),'शेर शिवराज' (Sher Shivraj) यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
संबंधित बातम्या