(Source: Poll of Polls)
Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल
Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी 'पुष्पा' सिनेमामुळे अल्लू अर्जुन चर्चेत होता. त्याच्या पुष्पा सिनेमाला जगभरातील चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
पुष्पा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे अल्लूचे चाहते पुष्पाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एका शैक्षणिक संस्थेला पाठिंबा दिल्याने अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी दावा केला की, दिशाभूल करणाऱ्या जाहीरातीत अल्लू अर्जुनने काम केले आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
अल्लू अर्जुनला याआधीदेखील टीकेला सामोरे जावे लागले होते
अल्लू अर्जुनला याआधीदेखील टीकेला सामोरे जावे लागले आहे. एका फूड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटिंगसाठी टीकेला सामोरे जावे लागले होते. तसेच सरकारी वाहतूक सेवेकडे दुर्लक्ष करून बाईक अॅपची जाहिरात केली होती.
अल्लू अर्जुनचे आगामी सिनेमे
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पुष्पा सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच अल्लू अर्जुन पुष्पा सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पु्ष्पा व्यतिरिक्त अल्लू अर्जुन वेणु श्रीराम यांच्या आयकॉन आणि कोराटाला शिव, एआर मुरुगादॉस, बोयापती श्रीनू आणि प्रशांत नीलच्या आगामी सिनेमातदेखील दिसणार आहे.
अल्लू अर्जुनने नाकारली होती तंबाखूची जाहिरात
अल्लू अर्जुनने पैशाचा विचार न करता जनतेच्या हिताचा विचार केला. त्यामुळे सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचे प्रचंड कौतुक झाले होते. अल्लूला त्याची जाहिरात पाहून त्याच्या चाहत्यांनी तंबाखूचे सेवन करायला सुरुवात करावी असे वाटत नाही. त्यामुळेच त्याने ही ऑफर नाकारली होती. अल्लू अर्जुन चाहत्यांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेत असतो.
संबंधित बातम्या