Allu Arjun : 'पुष्पा'चा असाही मोठेपणा; चाहत्यांसाठी तंबाखूची जाहिरात 'करेगा नही साला'
Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) जगभरात चाहते आहेत. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुन चर्चेत आला आहे. सध्या अल्लू अर्जुन तंबाखूच्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. त्याने तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे.
अल्लू अर्जुनने पैशाचा विचार न करता जनतेच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचे प्रचंड कौतुक होत आहे. अल्लूला त्याची जाहिरात पाहून त्याच्या चाहत्यांनी तंबाखूचे सेवन करायला सुरुवात करावी असे वाटत नाही. त्यामुळेच त्याने ही ऑफर नाकारली आहे.
View this post on Instagram
अल्लू अर्जुन तंबाखूचे सेवन करत नाही
मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन तंबाखू सारख्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करत नाही. त्यामुळेच त्याने तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. सिनेमांमध्ये अल्लू अर्जुन धूम्रपान करताना दिसतो. पण खऱ्या आयुष्यात तो या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. अल्लू अर्जुन चाहत्यांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेत असतो.
संबंधित बातम्या
Indian Idol Marathi : 'आवाज महाराष्ट्राचा' कोण ठरणार? पहिल्या मराठी 'इंडियन आयडल'चा फैसला आज
KL Rahul-Athiya Shetty Marriage : आलिया-रणबीरनंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात
Rohit Shetty : रोहित शेट्टीचे ओटीटीवर पदार्पण, 'Indian Police Force' वेब सीरिजची केली घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)