KGF 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा 'केजीएफ 2' ओटीटीवर होणार रिलीज
KGF 2 : 'केजीएफ 2' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
KGF 2 : दाक्षिणात्या अभिनेता यशचा (Yash) 'केजीएफ 2'(KGF 2) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अनेक बिग बजेट सिनेमांचे रेकॉर्ड या सिनेमाने मोडले आहेत. रिपोर्टनुसार, 'केजीएफ 2' हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यशचा बहुचर्चित 'केजीएफ 2' सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'केजीएफ' सिनेमाचा पहिला भाग याआधीच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. आता केजीएफचा दुसरा भागदेखील अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरच प्रदर्शित होणार आहे.
ओटीटीसह 'केजीएफ 2' सिनेमा छोट्या पडद्यावरदेखील दाखवला जाणार आहे. 'केजीएफ 2' सिनेमाची ओटीटी रिलीज डेट अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. प्रेक्षक गेले अनेक दिवस या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
View this post on Instagram
'केजीएफ 2' सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने जगभरात 250 कोटींची कमाई केली होती. 'केजीएफ 2' सिनेमाने पहिल्या दिवशी 53.95 कोटींची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या