एक्स्प्लोर

Ti Aani Shala : शाळेतल्या 'ती'ची गोष्ट! अल्लड वयातल्या प्रेमावर आधारित नवी वेब सिरीज

Ti Aani Shala : शाळेतल्या आठवणींना उजाळा देतानाच, त्या अजाण वयात भेटलेल्या 'ती' भोवतीची ही कहाणी आहे.

Ti Aani Shala : शाळेतल्या 'त्या' वयात आपल्या प्रत्येकालाच कोणी ना कोणी 'ती' किंवा 'तो' नक्कीच आवडत असतो. अजाण वयातल्या त्या भावना प्रत्येकासाठीच कायमच विशेष राहिलेल्या असतात. हाच धागा पकडत 'ती' आणि शाळा या नव्या वेब सिरीजची घोषणा स्टुडिओ 09 प्रॉडक्शनने नुकतीच सोशल मीडियावर केली आहे.

वेब सिरिजच्या शीर्षकावरूनच ही वेब सिरीज शाळेतल्या तिच्या भोवती फिरणारी असल्याचं समजते. शाळेतल्या आठवणींना उजाळा देतानाच, त्या अजाण वयात भेटलेल्या 'ती' भोवतीची ही कहाणी आहे. पुढे शाळा संपल्यानंतरही त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठे 'ती' कायम आहेच. शाळा संपल्यानंतर 'ती' त्याच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणते यावर भाष्य करणारी ही प्रेमळ वेब सिरीज लवकरच युट्युबच्या माध्यमातून स्टुडिओ 09 या चॅनलवर प्रसिद्ध होणार आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या साताऱ्यात वेब सिरीजच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून, या वेब सिरीज बद्दल दिग्दर्शक आशिष पुजारी सांगतात की, 'शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच खास राहिलेला विषय आहे. शाळा आपल्याला घडवते, शिकवते. अगदी त्याचप्रमाणे निरागस, निष्पाप वयात भेटलेली 'ती' देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी नकळत सांगते, शिकवते. त्यामुळे ही वेब सिरीज म्हणजे ती शाळा तसंच 'ती' आणि शाळा अशा दोन्ही अर्थाची आहे.'

अल्पावधीतच या वेब सिरीजचा आशय आणि विषयाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. याबाबत अधिक बोलताना स्टुडिओ 09 प्रोडक्शनचे निर्माते धनेश रामचंद्र पाटील सांगतात की, 'प्रत्येकाच्याच आयुष्यात घडणाऱ्या शाळेतल्या त्या अजाण वयातल्या जादुई प्रेमाची ही गोष्ट लवकरच प्रेक्षकांना स्टुडिओ 09 प्रॉडक्शनच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. यात असलेले सर्वच कलाकार आणि पडद्यामागे असलेली टीम हि सक्षम असल्याने एक उत्तम कलाकृती प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल अशी आशा आम्हाला वाटते.'

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Embed widget