'दबंग- 3' सिनेमातील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूक
दबंग सीरिजचा पहिला सिनेमा 2010 मध्ये आला होता. ज्याचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं होतं. तर दबंग- 2 चं दिग्दर्शन अरबाज खानने केलं होतं.

मुंबई : सलमान खानच्या बहुचर्चित 'दबंग- 3' सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता सिनेमातील सोनाक्षी सिन्हाचा लूक समोर आला आहे. सोनाक्षीने सोशल मीडियावर तिचा सिनेमातील लूकचा फोटो शेअर केला आहे.
सोनाक्षीचा 'दबंग-3' मधील लूक 'दबंग' सिनेमातील लूकशी मिळता-जुळता आहे. दबंग-3 मधील सोनाक्षीचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सोनाक्षीने कॅप्शन लिहीलं की, "रज्जो पुन्हा आली आहे!!! दबंग ते दबंग- 3... ही घरवापसी आहे. आज माझा शूटिंगचा पहिला दिवस आहे. मला विश करा.."
फर्स्ट लूकमध्ये सोनाक्षी गुलाबी साडीत सुंदर दिसत आहे. काही तासातच सोनाक्षीच्या या फोटोला लाखो लाईक्स मिळत आहेत. तसेच सोनाक्षीचे चाहते तिचा हा फोटो शेअरही करत आहेत.
याआधी सलमानने दंबग- 3 च्या सिनेमाच्या सेटवरुन पहिला फोटो शेअर केला होता. या फोटोत सलमानने आपल्या शर्टच्या कॉलरच्या मागे गॉगल लावला आहे. दबंग सिनेमातील सलमानची ही स्टाईल लोकांना खुप आवडली होती. या फोटोत सलमानसोबत प्रभू देवाही दिसत आहे.
View this post on InstagramDay1.... #dabangg3 @arbaazkhanofficial @prabhudheva @nikhildwivedi25
दबंग सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवा करणार आहे. दबंग सीरिजचा पहिला सिनेमा 2010 मध्ये आला होता. ज्याचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केलं होतं. तर दबंग- 2 चं दिग्दर्शन अरबाज खानने केलं होतं.























