एक्स्प्लोर

Udit Narayan : गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला? मॅनेजरने दिलं स्पष्टीकरण

Udit Narayan : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.

Udit Narayan : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. या बातम्या ऐकून त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीची अपडेट जाणून घ्यायची आहे. आपल्या लाडक्या गायकाला हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच चाहते त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत. मात्र, आता गायक उदित नारायण यांच्या मॅनेजरने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

उदित नारायण यांच्या मॅनेजरने ही संपूर्ण बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. उदित नारायण पूर्णपणे ठीक असून, त्यांना काहीही झालेले नाही, असे त्यांच्या  मॅनेजरने म्हटले आहे.

ही केवळ अफवा!

उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितले की, त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि उदितजींना काहीही झाले नाही. या अफवांना पूर्णविराम देत ते म्हणाले की, अशा बातम्या कुठून व्हायरल होत आहेत हेच आम्हाला कळत नाहीय. मात्र, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर त्यांना सतत कॉल येऊ लागले आहेत आणि ट्विटरवर देखील चाहते प्रश्नांचा भडीमार करत आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतः उदित नारायण यांच्याशी चर्चा केली. या व्हायरल बातम्यांमुळे उदित नारायण देखील अस्वस्थ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेपाळहून अफवा पसरवली जात असल्याचा संशय

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचे मॅनेजर याबद्दल सांगताना पुढे म्हणाले की, आम्हाला वाटते की, ही अफवा नेपाळमधून पसरवली जात आहे. कारण ज्या फोन क्रमांकावरून हा संदेश पसरवला जात आहे, तो नेपाळचाच कोड नंबर आहे. तिथे या असल्या खोट्या बातम्या कोण पसरवत आहे आणि अशा चुकीच्या बातम्या देऊन लोकांना का त्रास देत आहे, याची कल्पना नाही. पण, या चर्चांमुळे त्यांना सतत फोन येत असून, त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत.

उदितजीही झाले नाराज

खरं तर, गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळे जीव गमावणारे कलाकार यांच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. यामुळेच उदित नारायण यांचे चाहते या बातमीने अस्वस्थ झाले होते. मात्र, त्यांच्या मॅनेजरने या सगळ्या वृत्तांचे खंडन केले आणि सांगितले की, लोक सतत त्यांना याबद्दल विचारत आहेत, मात्र असे काहीही घडलेले नाही. उदित नारायण यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना अनेक फोन येत आहेत. इतकाच नाही तर, हे वृत्त सोशल मीडियावर देखील ट्रेंड होत आहे. ट्विटरवरचा याबद्दलचा ट्रेंड पाहून उदितजीही खूप नाराज झाले आहे, असे त्यांच्या मॅनेजरने म्हटले.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 6 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget