B Praak Baby Death : "वडील म्हणून दु:ख वाटतयं...", बाळाचा जन्मत: मृत्यू झाल्यानंतर गायक बी प्राकची भावूक पोस्ट
B Praak Baby Death : लोकप्रिय गायक बी प्राकच्या बाळाचे निधन झाले. त्याने भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
B Praak Baby Death : भारतातील लोकप्रिय गायक बी प्राकच्या (B Praak) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बी प्राक आणि मीरा बच्चन (Meera Bachan) दुसऱ्यांदा आई-वडील होणार होते. पण त्यांच्या बाळाचा जन्मत: मृत्यू झाला आहे. बी प्राकने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे.
बी प्राकने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, आमच्या बाळाचा जन्मत: मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या आम्ही खूप दुःखात आहोत. पण डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मी आभार मानू इच्छितो कारण त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि पाठिंबा दिला. आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या मला थोडा वेळ द्या."
View this post on Instagram
बी प्राकने याआधी मीरासोबतचा एक खास फोटो शेअर करत बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. या खास फोटोसाठी दोघांनीही खास ट्विनिंग केलं होतं. या फोटोत मीरा बेबी बंप दाखवताना दिसली होती. बी प्राक आणि मीरा 4 एप्रिल 2019 रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव अदब असे आहे.
संबंधित बातम्या