Squid Game: The Challenge : 456 स्पर्धक, 35 कोटींचे बक्षीस; नेटफ्लिक्सच्या नव्या 'स्क्विड गेम शो'ची घोषणा
स्क्विड गेम: द चॅलेंज (Squid Game: The Challenge) हा नवा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Squid Game: The Challenge : 2021 मधील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज 'स्किड गेम' (Squid Game) ला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दक्षिण कोरियन सीरिजचा लवकरच दुसरा सिझन रिलीज होणार आहे. पण आता नुकतीच नेटफ्लिक्सनं (Netflix) एक घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सचा स्क्विड गेम: द चॅलेंज (Squid Game: The Challenge) हा नवा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये एकूण 456 स्पर्धक सहभागी होणार आहेत. नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करुन या नव्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
स्क्विड गेम: द चॅलेंज या शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकाचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे, अशी माहिती या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी दिली. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी नेटफ्लिक्सच्या स्क्विडगेम कास्टिंग डॉट कॉम नावाच्या वेबसाइटमध्ये इच्छूकांना त्यांची माहिती भरावी लागेल. नेटफ्लिक्सनं 'स्क्विड गेम: द चॅलेंज' प्रोग्रॅमचा एक व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, 'तुम्हाला हा गेम खेळायचा आहे? स्क्विड गेम: द चॅलेंजसाठी कास्टिंग डॉट कॉम नावाच्या वेबसाइटला भेट द्या. ' स्क्विड गेम: द चॅलेंज या कार्यक्रमाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
Do you want to play a game? Enter to join Squid Game: The Challenge at https://t.co/MaXfZnqmvb pic.twitter.com/6gYLXlplDC
— Netflix (@netflix) June 14, 2022
स्क्विड गेम-2 ची घोषणा
स्किड गेम या सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शक ह्वांग डोंग ह्युक यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या नव्या सिझनची माहिती दिली होती. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'गेल्या वर्षी स्क्विड गेम्सचा पहिला सीझन आणण्यासाठी 12 वर्षे लागली. पण स्क्विड गेम्स अवघ्या 12 दिवसांत नेटफ्लिक्सवर लोकप्रिय वेब सीरिज बनली. स्किड गेमचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून जगभरातील चाहत्यांनी खूप कौतुक केलं. स्क्विड गेम पाहिल्याबद्दल आणि आवडल्याबद्दल धन्यवाद. आता जी-हान परत येत आहे. फ्रंट मॅन परत येत आहे, स्क्विड गेम सीझन 2 येत आहे. या सिझनमध्ये दाक्जी (Ddakji) खेळणारा सूट-बूटवाला व्यक्ती पुन्हा दिसेल. यंग-हीचा बॉयफ्रेड दिसेल.'
हेही वाचा: