Dhaakad : कंगनाच्या 'धाकड'ची किंमत फक्त 2.58 कोटी, निर्मात्याचे 78 कोटी रुपये पाण्यात
Dhaakad : कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे.
Kangana Ranaut Dhaakad : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. 85 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. पण या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.
निर्मात्यांना बसला आर्थिक फटका
'धाकड' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. 85 कोटींपेक्षा अधिक बजेटमध्ये 'धाकड'ची निर्मिती करण्यात आली आहे. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे निर्मात्यांचे 78 कोटींचे नुकसान झाले आहे.
'धाकड' हा एक अॅक्शन ड्रामा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केलं आहे. या सिनेमात कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने कंगनाने ‘रॉ एजंट’ची भूमिका साकारली आहे. तर 'भूल भुलैया 2' सिनेमाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे.
'धाकड'मध्ये अॅक्शनचा तडका
कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात कंगनाचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सिनेमात कंगनाने एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.
'भूल भुलैया 2'मुळे 'धाकड' पडला मागे
'धाकड' सिनेमा कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. कंगनाच्या 'धाकड' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण दुसरीकडे प्रेक्षकांना 'भूल भुलैया 2' ची क्रेझ होती. त्यामुळे प्रेक्षकांनी 'भूल भुलैया 2'ला पसंती दर्शवली. 'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या मराठी सिनेमांनीदेखील धाकडपेक्षा अधिक कमाई केली आहे.
संबंधित बातम्या