एक्स्प्लोर

Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाची 58व्या वर्षी आई झाली ते तंत्रज्ञान आहे तरी काय? सर्व महिलांना शक्य आहे का?

Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर सिंहने (Charan Kaur Singh) आयव्हीएफ (IVF) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वयाच्या 58 व्या वर्षी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. IVF नक्की काय आहे जाणून घ्या...

Sidhu Moosewala : पंजाबी गायक, रॅपर सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala) याचे आई-बाबा पुन्हा एकदा पालक झाले आहेत. त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर सिंह (Charan Kau Singh) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी आई झाल्याने सिद्धूची आई चर्चेत आहे. चरण कौर यांनी IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन (In Vitro Fertilisation) या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे. हे तंत्रज्ञान नक्की काय आहे? सर्व महिलांना शक्य आहे का? जाणून घ्या..

IVF तंत्रज्ञान काय आहे? (What is IVF?)

नैसर्गिक गर्भधारणा (Natural Pregnancy) होत नसेल तर आयव्हीएफ (IVF) या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अनेक कारणांनी लोक या पर्यायाचा अवलंब करतात. डॉ. नैना पटेल यांनी बीबीसीला माहिती देत म्हटलं की, IVF ची सुरुवात 1978 मध्ये झाली आहे. IVF मध्ये स्त्रीबीज आणि पुरुष जोडीदाराचा शुक्राणू काही काळासाठी लॅबमध्ये ठेवलं जातो. पुढे भ्रूण तयार झाल्यानंतर त्याला महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील महिला IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आई होऊ शकते. 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनची 34 वर्षीय नताली गुयानला एक गंभीर आजार होता. या आजारामुळे तिला प्रजननसंबंधी समस्या भेडसावत होत्या. पण 2024 मध्ये IVF च्या माध्यमातून तिने एका मुलाला जन्म दिला. ब्रिटनचीच आणखी एक महिला 38 वर्षीय हॉविस बैरेट यांना 2019 मध्ये आयव्हीएफच्या माध्यमातून दोन मुलं झाली. सिद्धू मुसेवालाच्या 58 वर्षीय आईने मुलाला जन्म दिला. 

IVF सुरक्षित आहे का? (How IVF Works)

मेनोपॉजनंतर IVF च्या माध्यमातून प्रेग्नंट राहणं खूपच अवघड आहे. मेनोपॉजचा अर्थ आहे की, महिलांच्या शरीरात स्त्रीबीज बनणं कठीण होतं. जसं जसं महिलांचं वय वाढतं तसं हार्मोन कमी होऊ लागतात. वय आणि प्रकृती या दोन्ही गोष्टींचा विचार आयव्हीएफसाठी केला जातो. 

'या' कारणाने सिद्धू मुसेवालाच्या आईला शक्य झालं IVF (Sidhu Moosewala Parents IVF Pregnancy)

स्त्रीरोगतज्ज्ञ रजनी जिंदल, यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाची आई फिट होती. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. वय वाढल्यानंतर जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुमच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चरण कौर दररोज मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात येत असे. वय वाढल्यानंतर रक्तदाब वाढू शकतो, रक्तस्त्राव होऊ शकतो. पण चरण कौर यांची प्रकृती स्थिर होती. त्यांना कोणतेही आजार नव्हते. त्यामुळे IVF यशस्वीरित्या पार पडलं. 

वय वाढण्यासोबत शरीरात अनेक बदल होत असतात. डॉ. नयना पटेल यांनी बीबीसीला माहिती देत म्हटलं,"35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांना 80% यश मिळतं. 35-40 वय असेल तर बाळ होण्याचं प्रमाण 60% आहे.

संबंधित बातम्या

Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या घरी पाळणा हलला! वयाच्या 58 व्या वर्षी बलकौर सिंह पुन्हा बापमाणूस, तंत्रज्ञानाने केली कमाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 पोरसवदा तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Embed widget