Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या घरी पाळणा हलला! वयाच्या 58 व्या वर्षी बलकौर सिंह पुन्हा बापमाणूस, तंत्रज्ञानाने केली कमाल
Sidhu Moosewala Parents New Baby : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या आईने चरण कौर सिंहने (Charan Kaur Singh) वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. तर बलकौर सिंह (Balkaur Singh) पुन्हा बापमाणूस झाले आहेत.
Siddu Moosewala : दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला (Siddhu Moosewala) याची आई चरण कौर सिंहने (Charan Kaur Singh) वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी नवजात बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सिद्धूच्या वडिलांनी दिली आनंदाची बातमी (Balkaur Singh Shared Photo)
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी आज (17 मार्च 2024) सकाळी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत बाळदेखील दिसत आहे. बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करत त्यांनी पंजाबीमध्ये लिहिलं आहे,"शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांच्या आशीर्वादाने आज त्याच्या धाकट्या भावाचं स्वागत करत आहोत. देवाच्या आशीर्वादाने बाळ सुखरुप आहे. सर्व हितचिंतकांनी दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे". तसेच मागे सिद्धू मुसेवालाचा एक फोटो दिसत आहे. या फोटोवर 'Legends Never Die' असं लिहिलेलं दिसत आहे. सिद्धूच्या वडिलांची पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली आहे.
View this post on Instagram
बलकौर सिंह दुसऱ्यांदा झाले बाबा
बलकौर सिंह आणि चरण कौर सिंह दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर बलकौर यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण आता बलकौर सिंह यांनीच बाळाचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं होतं. त्याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील मात्र एकटे पडले होते. त्यामुळे IVF च्या मदतीने त्यांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. आता मुसेवाला घराण्याला मिळालेल्या नव्या वारसदाराची चर्चा आहे. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धूला भाऊ झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुसेवालाचा नवा वारसदारदेखील गायक व्हावा, अशी इच्छा ते व्यक्त करत आहेत. सिद्धूच्या निधनाला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. पण आजही त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. त्याची गाणी चाहते आवडीने ऐकतात.
संबंधित बातम्या