Om Bhutkar: साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी केलेली तयारी ते शूटिंगदरम्यानच्या आठवणी; 'श्यामची आई' चित्रपटाबद्दल भरभरुन बोलला ओम भूतकर
ओम भूतकरनं (Om Bhutkar) एबीपी माझाला खास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये ओमनं साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी त्यानं केलेली तयारी तसेच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
![Om Bhutkar: साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी केलेली तयारी ते शूटिंगदरम्यानच्या आठवणी; 'श्यामची आई' चित्रपटाबद्दल भरभरुन बोलला ओम भूतकर shyamchi aai marathi movie Om Bhutkar in sane guruji role actor talk about movie shooting and character in film Om Bhutkar: साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी केलेली तयारी ते शूटिंगदरम्यानच्या आठवणी; 'श्यामची आई' चित्रपटाबद्दल भरभरुन बोलला ओम भूतकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/01b6b6829576ce1f6520e77d9d8fce611697093301282259_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shyamchi Aai Movie: 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या आगामी मराठी चित्रपटात हरहुन्नरी अभिनेता ओम भूतकरनं (Om Bhutkar) साने गुरुजींची भूमिका साकारली आहे. 'श्यामची आई' हा चित्रपट 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ओम भूतकरला साने गुरुजींच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतीच ओमनं एबीपी माझाला खास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये ओमनं साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी त्यानं केलेली तयारी तसेच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.
साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी ओमनं अशी केली तयारी
'श्यामची आई' या चित्रपटात साने गुरुजी यांची भूमिका साकारण्यासाठी केलेल्या तयारीबाबत ओम म्हणाला, "आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी होती. या चित्रपटात अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व सादर करायचं होतं. मी साने गुरुजींचं "श्यामचा जीवनविकास" हे पुस्तक वाचलं. त्यावेळचे संदर्भ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाची स्क्रिप्ट मी वाचत होतो. त्यामधील माझे सीन मी पुन्हा-पुन्हा वाचले. चित्रपटाच्या सेटवर गेल्यावर सुजयसोबत माझं बोलणं झालं. आम्ही दोघांनी मिळून बॉडी लँग्वेज कशी असावी? याबद्दल चर्चा केली. तसेच लहान वयातील श्यामची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे सीन्स पाहून त्याच्यासोबत सुसंगत होण्याचा प्रयत्न केला."
'श्यामची आई' या चित्रपटातील भूमिकेबाबत ओमनं सांगितलं, "चॅलेंजिंग भूमिका होती. कारण खूप मोठ्या व्यक्तीमत्वची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला. माझ्याकडून जेवढा प्रयत्न करता आला तेवढा मी केला. भूमिकेचा मी आभ्यास केला आणि दिग्दर्शकानं जसं सांगितलं तसं काम करुन चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. "
ओमनं सांगितल्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी
'श्यामची आई' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणींबद्दल ओमनं सांगितलं, "अतिशय रम्या ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग झालं. तो पन्हाळ्याचा परिसर होता. सेटवरचं वातावरण देखील खूप चांगलं होतं. सेटवरील वातावरण अतिशय खेळीमेळीचं होतं. माझं पाच-सहा दिवसांचे शूटिंग होतं. सुजयसोबत आधीसुद्धा काम केलंय. त्याच्यासोबत काम करायला मजा येते. चांगला चित्रपट झाला असेल अशी आमची आपेक्षा आहे."
'श्यामची आई' या चित्रपटात अभिनेता ओम भूतकरसोबतच गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Shyamchi Aai Movie Teaser: प्रतीक्षा संपली! 'श्यामची आई' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; टीझर रिलीज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)