एक्स्प्लोर
इतर सिनेमांच्या प्रदर्शनावर शिवसेनेचा आक्षेप नाही : संजय राऊत
'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर लॉन्सनंतर बाळा लोकरे यांची फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. येत्या 25 जानेवारीला 'ठाकरे' सिनेमाव्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकी वजा इशारा बाळा लोकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
मुंबई : 'ठाकरे' व्यतिरिक्त 25 जानेवारीला दुसरा कोणताही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे चित्रपट सेना सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला होता. मात्र शिवसेनेची भूमिका नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
'ठाकरे' व्यतिरिक्त 25 जानेवारीला दुसरा कोणताही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोक उत्साहाने, प्रेमाने मत व्यक्त करत आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
काय म्हणाले होते बाळा लोकरे?
'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर लॉन्सनंतर बाळा लोकरे यांची फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. येत्या 25 जानेवारीला 'ठाकरे' सिनेमाव्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकी वजा इशारा बाळा लोकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
त्यानंतर लोकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी इतर कोणताही चित्रपट आम्ही चालू देणार नाही. जर कुणी इतर चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची ही इच्छा असल्याने आम्ही यावर ठाम आहोत, असं बाळा लोकरे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
'छातीत नाही, खरी ताकत माणसाच्या मेंदूत असते', 'ठाकरे'त दणकेबाज संवादांची पर्वणी
बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च
'ठाकरे' सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात
'ठाकरे' सिनेमातील संवादावर अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप
'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement