Shatrughan Sinha : रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली हेल्थ अपडेट देताना सोनाक्षी-झहीरच्या लग्नावर सुरू असलेल्या चर्चांवर मौन सोडले आहे.
Shatrughan Sinha Shares Health Update : लेक सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी त्यांच्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर थेट भाष्य केले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली हेल्थ अपडेट देताना सोनाक्षी-झहीरच्या लग्नावर सुरू असलेल्या चर्चांवर मौन सोडले आहे.
अशा चुकीच्या बातम्या कुठून येतात?
शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आले की, तुम्ही सोफ्यावरून पडले असल्याचे वृत्त समोर आले. त्यावर 'टाईम्स नाऊ'शी बोलताना त्यांनी म्हटले की,मैं सोफे से गिर पड़ी हे लताजी यांचे गाणं होते. गंमतीचा भाग सोडून द्या, पण सोफ्यावर लोळण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. या सगळ्या बातम्या कुठून येत आहेत, असं विचारल्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, 'या बातम्या कुठून येत आहेत हे मला माहीत आहे. पण ती व्यक्ती माझे वाईट चिंतीत नाही, त्यामुळे सोडून द्या, असे त्यांनी सांगितले. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, हे मलाच माहित नाही असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावर सांगितले.
हॉस्पिटलमध्ये दाखल का झाले?
रुग्णालयात दाखल का व्हावे लागले. यावर शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सांगितले की, मी वर्षातून एकदा संपूर्ण शरिराची वैद्यकीय चाचणी करतो. त्याच वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल झालो होतो असेही त्यांनी म्हटले. मी तर असे म्हणेन की, जे 60 वर्षावरील मंडळी आहेत, त्यांनी आपली नियमितपणे वैद्यकीय तपासणी करावी. मी निवडणूक प्रचारासाठी खूप प्रवास केला.त्यानंतर माझ्या मुलीचे लग्न झाले. आता मी तरुण नाही. एका दिवसात 3 शिफ्टमध्ये काम करेल आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पार्टी करावी.
सोनाक्षीच्या लग्नावर काय म्हटले?
शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, माझ्या मुलीचे लग्न झाले, मी खूष आहे. सगळं काही देवाच्या कृ्पेने माझ्या मुलीचे वैवाहिक आयुष्य सुरू झाले आहे. जी मंडळी सोनाक्षीच्या लग्नावर खूष नाहीत, त्यांना सांगण्यासाठी काहीच नाही असेही शत्रु्घ्न सिन्हा यांनी म्हटले.
रुग्णालयात पोहचली होती सोनाक्षी-झहीर
लग्नाच्या दोन दिवसातच सोनाक्षी-झहीर हे मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या. मात्र, काही तासानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. सोनाक्षीच्या लग्नाची बातमी समोर येताच शत्रुघ्न सिन्हा हे नाखुश असल्याचं म्हटलं जात होतं. पण सोनाक्षीच्या लग्नात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच साऱ्या प्रश्नांची उत्तर देऊन गेला.