Priya Marathe : प्रिया मराठे पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत, 'या' मालिकेत साकारणार निगेटिव्ह रोल
Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रिया मराठे या नव्या मालिकेत खलनायकी भूमिका साकारत आहे.
![Priya Marathe : प्रिया मराठे पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत, 'या' मालिकेत साकारणार निगेटिव्ह रोल Priya Marathe Actress playing negative role in upcoming marathi serial Tu Bhetashi Navyane Priya Marathe : प्रिया मराठे पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत, 'या' मालिकेत साकारणार निगेटिव्ह रोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/ec805ec6cd496e10b8243303df5db67e1720169776853290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Priya Marathe : रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रिया मराठे या नव्या मालिकेत खलनायकी भूमिका साकारत आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत प्रिया नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या भूमिका आहेत.
अभिनेत्री प्रिया मराठेने अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका तसेच खलनायकी साकारल्या आहेत. प्रियाने याआधी 'स्टार प्रवाह'वरील 'तुझेच गीत गात आहे' या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. लवकरच प्रिया मराठे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही पहिलीच टीव्ही मालिका आहे.या मालिकेत अभिनेता सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत असणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सुबोध भावे हा 20 ते 25 वर्ष लहान असलेल्या महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारणार आहे. ही मालिका येत्या 8 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे.
प्रियाची भूमिका कशी असणार?
या मालिकेत प्रिया मराठे खलनायिका साकारणार आहे. ‘रागिणी अग्निहोत्री’ असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजेशिर्केच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी रागिणी काय आणि कशाप्रकारे षडयंत्र रचते? ते मालिकेत पहाता येणार आहे. रागिणीच्या येण्याने अभिमन्यू आणि गौरीच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार? गोड बोलून रागिणी आपला डाव कसा साधणार? हे दाखवताना प्रेमाच्या कसोटीवर कोण कसं खरं उतरणार? याची रंजक कथा मालिकेत पहायला मिळणार आहे.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत निगेटिव्ह रोल करायला प्रिया मराठे खूपच उत्सुक आहे. प्रियाने आपल्या भूमिकेबद्दल प्रिया सांगते कि, जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्त्वाची आहे याकडे माझं लक्ष असते. मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडल असल्याचे प्रियाने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)