CM Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बँक खात्यात कधी येणार? अजितदादांनी तारीख सांगितली
Maharashtra Assembly monsoon session: अजित पवार यांचे सभागृहात मॅरेथॉन भाषण. विरोधकांना चिमटे काढत घेतली फिरकी. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबाबत महत्त्वाची माहिती. महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये कधी येणार?
मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्या दिवसापासून 'मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहीण योजना' ही सरकारी योजना प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेतंर्गत राज्यातील अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेची घोषणा झाल्यापासून ग्रामीण भागांमध्ये सेतू केंद्र आणि ग्रामपंचायतींमध्ये लाडकी बहीण योजनेचे (mukhyamantri mazi ladki bahin yojana) अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. मात्र, प्रचंड गर्दी झाल्याने अनेक महिलांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. याचाच फायदा घेत काही दलालांनी पैसे घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देण्याचा धंदा सुरु केला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी सभागृहात महत्त्वाचे भाष्य केले.
अजित पवार यांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नका, असे आवाहन केले आहे. महिलांनो कुणालाही पैसे देऊ नका. कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सांगा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे ऑगस्टमध्ये हातात आले तरी तुम्हाला 1 जुलैपासूनची रक्कम मिळेल. योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची महत्त्वाची मुदतही वाढवून दिली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
कोण असणार पात्र?
* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
अपात्र कोण असेल?
* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.
आणखी वाचा
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भराल? फॉर्म झटपट डाऊनलोड करा