एक्स्प्लोर
Advertisement
शाहरुख-काजोल जोडी पुन्हा एकत्र झळकणार ?
बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमापासून अलिकडे रिलीज झालेल्या ‘दिलवाले’ सिनेमातील शाहरुख आणि काजोलच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं.
मुंबई : बॉलिवूडमधील शाहरुख खान आणि काजोल या आयकॉनिक जोडीने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवले. हीच लोकप्रिय जोडी आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
‘पिंकव्हिला’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहरच्या आगामी सिनेमातून शाहरुख-काजोल ही जोडी पडद्यावर कमबॅक करणार आहे. शाहरुख आणि काजोल हे दोघेही करणच्या सिनेमात काम करण्यास उत्सुक आहेत, असं या वृत्तात म्हटलं आहे.
बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमापासून अलिकडे रिलीज झालेल्या ‘दिलवाले’ सिनेमातील शाहरुख आणि काजोलच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं.
करण जोहर सध्या एका नव्या स्क्रिप्टवर काम करत असून या सिनेमासाठी तो शाहरुख आणि काजोलच्या नावाचा विचार करत आहे. असं असलं तरीही करण जोहरने शाहरुख आणि काजोलबरोबर अजूनही या सिनेमाबाबत कोणतंही कॉन्ट्रॅक्ट केलेलं नाही, अशी माहिती आहे.
दरम्यान,अभिनेत्री काजोल आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यामध्ये काही काळापूर्वी मतभेद झाले होते. त्यामुळेच काजोलने करणच्या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. परंतु आता या दोघांतील मतभेद दूर झाले असून काजोल करण जोहरच्या सिनेमात काम करण्यास तयार असल्याचं ‘पिंकव्हिला’च्या वृत्तात म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ठाणे
विश्व
Advertisement