एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'जवान'ची रिलीज डेट ढकलली पुढे; आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Shah Rukh Khan Jawan Release Date : 'पठाण' (Pathaan) सिनेमानंतर शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 

'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. दाक्षिणात्य सिनेमांचा दिग्दर्शक एटली या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 'जवान'ची रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे शाहरुखचे चाहते नाराज झाले आहेत. निर्माते लवकरच अधिकृतरित्या नवी रिलीज डेट जाहीर करतील. 

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

'जवान'च्या निर्मात्यांनी 2022 मध्ये टीझर शेअर करत 'जवान'ची रिलीज डेट जाहीर केली होती. आता 2 जूनला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून अद्याप या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झालेली नाही. पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला वेळ लागत असल्याने आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने सांभाळली आहे. तर या सिनेमात शाहरुख खानसोबत नयनतारा आणि विजय सेतुपतीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना थलापती विजय आणि अल्लू अर्जुन या दाक्षिणात्य सुपरस्टार्सची झलक पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. 

शाहरुखची दुहेरी भूमिका

अॅक्शनचा तडका असलेल्या 'जवान' या सिनेमाच्या शूटिंगला 2022 मध्ये सुरुवात झाली आहे. या सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. या सिनेमात शाहरुखसह विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुख खानला दिलासा; 'जवान' सिनेमातील लीक झालेले सीन काढून टाकण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget