एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरुख खानला दिलासा; 'जवान' सिनेमातील लीक झालेले सीन काढून टाकण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

Jawan Leaked Clips : शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'जवान' या सिनेमातील लीक झालेले सीन काढून टाकण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Shah Rukh Khan Jawan Leaked Clips : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता चाहते त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी 'जवान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर 'जवान'ची निर्मिती करणाऱ्या रेड चिलीज एंटरटेनमेन्टने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. 

किंग खानला मिळाला दिलासा

शाहरुख खान आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेन्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरअंतर्गत 'जवान' सिनेमाची निर्मिती होत आहे. आता टीवी प्लॅटफॉर्म, डायरेक्ट टू होम सेवा यांना
कॉपीराइटचे उल्लंघन करण्यापासून रोखले आहे. रेड चिलीज एंटरटेनमेन्टने खटला दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती हरी शंकर यांनी 'जवान' या सिनेमातील लीक झालेले सीन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. 

'जवान' सिनेमातील लीक झालेल्या क्लिपच्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व सोशल मीडियावरुन या क्लिप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, युट्यूब, गुगल, ट्विटर आणि रेडित या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला 'जवान' सिनेमाच्या कॉपीराइट केलेल्या कंटेटचा प्रचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी 'जवान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओमध्ये शाहरुख अॅक्शन करताना दिसत होता. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो नयनतारासोबत दिसत होता. पण आता न्यायालयाच्या निर्णयामुळे शाहरुख खान आणि 'जवान' सिनेमाच्या टीमला दिलासा मिळाला आहे. 

'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने सांभाळली आहे. तर या सिनेमात शाहरुख खानसोबत नयनतारा आणि विजय सेतुपतीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना थलापती विजय आणि अल्लू अर्जुन या दाक्षिणात्य सुपरस्टार्सची झलक पाहायला मिळणार आहे. 

शाहरुखचा 'जवान' कधी प्रदर्शित होणार? (Shah Rukh Khan Jawan Release Date)

शाहरुख खानचा आगामी 'जवान' हा सिनेमा 2 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मे महिन्यात या सिनेमाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : 'जवान'मधील 'तो' सीन लीक; अंगावर शहारे आणणारा शाहरुखचा अ‍ॅक्शन मोड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget