Salman Khan : सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू : संजय पांडे
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. सध्या पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
Salman Khan Death Threat : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी दिली आहे. दबंग खानच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे.
मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे पुढे म्हणाले,"सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून आवश्यक ती पावले उचचली जात आहेत. पत्र खोटे आहे की खरे या निष्कर्षावर आताच पोहोचू शकत नाही".
5 जून रोजी सलमान खान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Maharashtra | Mumbai Police is taking the matter as seriously as the case is. We are investigating the letter he received & the whole matter... no one has been detained as of now. We'll increase security if required: Mumbai CP Sanjay Pandey, on threat letter to actor Salman Khan pic.twitter.com/STgkLWADIi
— ANI (@ANI) June 6, 2022
नेमकं प्रकरण काय?
सलमान खानचे वडील सलीम खान हे रविवारी सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता, त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी आता सलमान खांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सलमानच्या जीवाला धोका
संगीतकार सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी होता. त्यामुळे सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात आले होते. सिद्धूच्या हत्येनंतर सहा दिवसांनी सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले आहे.
संबंधित बातम्या