(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Santosh Juvekar : 'हे काय आहे ओ? गुदमरून मरण्यासाठी केलेली सोय?' संतोष जुवेकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष
संतोषनं (Santosh Juvekar) नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Santosh Juvekar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकरचा (Santosh Juvekar) चाहता वर्ग मोठा आहे. संतोष हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. संतोष हा सोशल मीडियावर (Social Media) बराच अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. संतोषनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
संतोषनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'हे काय आहे ओ? बहुतेक गुदमरून मारण्यासाठी केलेले contract किंवा स्वतः गुदमरून मरण्या साठी केलेली सोय?'संतोष शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेक नेटकऱ्यांनी संतोषच्या या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
संतोषनं शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यानं कमेंट केली, 'महाराष्ट्रात सर्वात प्रदूषित शहर झालं आहे नवी मुंबई. भारतातील सर्वात स्वच्छ महानगरपालिक असून पण हे हाल आहेत. एक प्लॅन सिटी , चांगली कनेक्टिव्हिटी असून पण हे हाल.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. आपण फक्त बघा आणि शांत बसा, असंच होणार. तसेच नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आकाशी उंच उडणारे पक्षी पण पा त्या धुरातून गुदमरून इकडून तिकडून उडताना दिसत आहेत. किती भयानक आहे हे सर्व'
View this post on Instagram
संतोषनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या मोरया आणि झेंडा या चित्रपटांना विशेष पसंती मिळाली. तसेच एक थी बेगम या वेब सीरिजमध्ये देखील संतोषनं महत्वाची भूमिका साकारली. संतोषच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. त्याला इनस्टाग्रामवर 109K फॉलोवर्स आहेत. संतोषचा काही महिन्यांपूर्वी ‘36 गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Santosh Juvekar : संतोष जुवेकरचं आवाहन; 'सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका'