एक्स्प्लोर
भन्साळी मुंबईला परतणार, 'पद्मावती'चं शूटिंग रद्द
जयपूर : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना राजस्थानातील जयपूरमध्ये मारहाण झाल्यानंतर, बॉलीवूडकरांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. चित्रपटाच्या कथेला आक्षेप घेत राजपूत समाजाशी संबंधित करणी सेनेने भन्साळींवर हल्ला केला.
या मारहाणीनंतर अनेक दिग्दर्शकांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी संजय लीला भन्साळी यांचं समर्थन केलं. भन्साळींनी मात्र 'पद्मावती'चं शूटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला असून ते संपूर्ण क्रू मेंबरसह मुंबईला परतणार आहेत. शिवाय राजस्थानमध्ये पुन्हा कधीही शूटिंग न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सेलिब्रिटींकडून हल्ल्याचा निषेध
अभिनेत्री प्रियांका चोप्रा, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल, रितेश देशमुख, हृतिक रोशन यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे.
'पद्मावती'च्या सेटची तोडफोड
जयगड किल्ल्यात भन्साळी यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरु असतानाच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन निषेध केला. त्यांनी सेटवरील सामानाचीही तोडफोड केली. तसंच संजय भन्साळी यांच्या थोबाडात मारली. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
जयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण
राणी पद्मावती यांची प्रतिमा आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने विरोध केल्याचं करणी सेनेकडून सांगण्यात येत आहे.भन्साळींवरील हल्ल्याविरोधात बॉलिवूड एकवटलं
करणी सेनेने याआधीही हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ सिनेमालाही विरोध केला होता. करणी सेना स्वत:ला राजपूतांच्या हितांची रक्षक असल्याचं सांगते. करणी सेना राजस्थानमध्ये काम करते.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement