एक्स्प्लोर
तब्बल 4 वर्षांनंतर संजय दत्तचं पहिलं ट्वीट!
'भूमी' या त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. यानिमित्ताने संजय दत्त ट्विटरवर तब्बल 4 वर्षांनंतर सक्रिय झाला आहे.
मुंबई : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्तचा पहिला सिनेमा येणार आहे. 'भूमी' या त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. यानिमित्ताने संजय दत्त ट्विटरवर तब्बल 4 वर्षांनंतर सक्रिय झाला आहे.
संजय दत्तने शेवटचं ट्वीट यापूर्वी 7 जुलै 2013 रोजी केलं होतं. तर 'पोलिसगिरी' या सिनेमाच्या वेळीही 20 मार्च 2013 रोजी त्याने ट्वीट केलं होतं. त्यानंतर आता चार वर्षानंतर त्याने पहिलं ट्वीट करत 'भूमी'चं पोस्टर शेअर केलं आहे.
https://twitter.com/duttsanjay/status/891176242770173952
'भूमी'चं पोस्टर संजय दत्तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर करण्यात आलं. संजय दत्त आणि दिग्दर्शक उमंग कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्टर रिलीज केलं. ‘बाबा इज बॅक’ या हॅशटॅगसोबत हे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे.
येत्या 22 सप्टेंबरला ‘भूमी’ सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मोठ्या कालावधीनंतर संजय दत्त पुनरागमन करत असल्याने सिनेमाची उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे. त्यात पोस्टर पाहता या सिनेमाची आणि संजय दत्तच्या लूकची उत्सुकता आणखीच वाढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement