एक्स्प्लोर
सलमानकडून सफाई कामगारांच्या वेदना मांडणारा व्हिडिओ शेअर
मुंबई : अभिनेता सलमान खानने आपली घाण काढणाऱ्या सफाई कामगारांचा वास्तवदर्शी परिस्थिती मांडणारा व्हिडिओ शेअर केला आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन या व्हिडिओमधून करण्यात आलं आहे. तसंच मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या या हातांचे आभार मानन्याचं आवाहनही त्याने केलं आहे.
स्वच्छतेच्या बाबतेत आपण एकट्याने केल्याने काय होते, असं म्हणून स्वतःची जबाबदारी आपण नेहमी झटकतो. पण सफाई कर्मचाऱ्यांना आपली घाण काढावी लागते, असं हृदयस्पर्शी वास्तव या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.
मुंबई असो किंवा आपलं घर, ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वतःचीच आहे. पण सर्व शहराचा कचरा उचलणाऱ्या या हातांना निदान धन्यवाद तरी म्हणायला पाहिजे, असं सलमानने म्हटलं आहे.
सलमानची काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचा स्वच्छतादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर सलमानही विविध उपक्रमांद्वारे मुंबईकरांना मुंबई स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करत आहे.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/821362420106989568
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement