एक्स्प्लोर
'दबंग 3' मध्ये सलमानसोबत सोनाक्षी नव्हे, 'या' अभिनेत्रीची वर्णी ?
मुंबई : सलमान खानच्या 'दबंग' सीरिजला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळला होता. दबंगच्या आगामी तिसऱ्या भागाची उत्सुकता आहेच, त्याप्रमाणे सलमानसोबत कोणत्या अभिनेत्री वर्णी लागणार याचीही चर्चा आहे. तिसऱ्या सिक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी परिणीती चोप्राची निवड होण्याचे संकेत आहेत.
चुलबुल पांडे साकारणाऱ्या सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा पहिल्या दोन भागांमध्ये झळकली होती. मात्र तिसऱ्या भागात सोनाक्षीऐवजी नवा चेहरा दिसण्याची शक्यता आहे. अनेक अभिनेत्रींना मागे टाकत परिणीतीला ही संधी मिळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
सोनाक्षीसोबत काम करण्यास सलमान खान फारसा उत्सुक नसल्यामुळे निर्माता अरबाज खानने नव्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आहे. अरबाजचा 'डॉली की डोली' सोनाक्षीने नाकारल्यामुळे अरबाज नाखुश होता, त्यातूनच सोनाक्षीला हटवल्याची चर्चा आहे. दबंग 3 च्या पटकथेवर सध्या काम सुरु असून पुढल्या वर्षी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement