एक्स्प्लोर
'सैराट'नं रचला इतिहास... तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!
!['सैराट'नं रचला इतिहास... तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन! Sairat Earns 55 Corer On Box Office 'सैराट'नं रचला इतिहास... तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/02181747/sairat-photo-01-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमानं मराठी सिनेसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. कारण की सैराट सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 2 आठवड्यात तब्बल 55 कोटीची कमाई केली आहे.
आजवर एकाही मराठी सिनेमाला 50 कोटींपर्यंत मजल मारता आली नव्हती. सैराट सिनेमानं सर्व रेकॉर्ड मोडीत काढत थेट 55 कोटींची कमाई केली असून अजूनही त्यांची विक्रमी घौडदौड सुरुच आहे.
याच निमित्तानं आज सैराटच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सिनेमा 50 कोटींचा टप्पा गाठेल असं अधीच वाटलं होतं अशी प्रतिक्रिया यावेळी या सिनेमाचे संगीतकार अजय-अतुल यांनी दिली.
दरम्यान, याआधी अवघ्या 11 दिवसात 41 कोटींचा गल्ला जमवत सैराट मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता.
‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली.
यापूर्वी ‘नटसम्राट’ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या 10 दिवसांतच पार केला.
दुसरीकडे ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता. तर रवी जाधव यांच्या टाईपमास- 2 ने पहिल्या 3 दिवसांमध्ये तब्बल 11 कोटी रुपयांची कमाई केली होती.
मराठी सिनेमांची कमाई
यापूर्वी ‘दुनियादारी’ या सिनेमाने 26 कोटी कमावून, मराठी सिनेमाच्या कमाईचा ट्रेण्ड तयार केला होता. मग ‘टाईमपास’ या सिनेमाने त्यापुढे मजल मारून 32 कोटींची कमाई केली. याशिवाय ‘टाईमपास 2’नेही 28 कोटी कमावले होते. मात्र ‘लय भारी’ सिनेमाने तब्बल 38 कोटींचा गल्ला जमवून, मराठी सिनेसृष्टीत कमाईचा विक्रम प्रस्थापित केला होता.
मराठी सिनेमांची भरारी
*दुनियादारी : 26 कोटी
*टाईमपास – 32 कोटी
*टाईमपास 2 – 28 कोटी
*लय भारी – 38 कोटी
* नटसम्राट – 40 कोटी
*कट्यार काळजात घुसली – 31 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
बातम्या
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)