एक्स्प्लोर
काँग्रॅट्स अंकल, सैफच्या पहिल्या लग्नात करिनाच्या शुभेच्छा
मुंबई : मन्सूर अली खान पतौडी... मग सैफ अली खान पतौडी आणि आता तैमूर अली खान पतौडी... सैफ अली खान पतौडी आणि करिना कपूर-खानला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि हरियाणातल्या पतौडी संस्थानामध्ये जणू नव्या वर्षाचा जल्लोष आधीच सुरु झाला.
'पुत्ररत्नाची बातमी आपल्यासोबत शेअर करण्यास आम्हाला अत्यानंद होत आहे. आमच्या घरी 20 तारखेला तैमूर अली खान पतौडीचा जन्म झाला आहे. गेल्या 9 महिन्यांच्या काळात मीडिया, चाहते आणि हितचिंतकांच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. सर्वांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा' असा संदेश त्यांनी दिला.
करिना आणि सैफ यांना बॉलिवुडमध्ये त्यांच्या रिल आणि रियल लाईफ केमिस्ट्रीसाठी सैफिना म्हणून ओळखलं जातं. पण त्यांची ही ओळख बनण्याआधी दोघांच्या आयुष्यातल्या सनावळ्या थक्क करणाऱ्या आहेत
सैफचं पहिलं लग्न अमृता सिंहशी झालं होतं. अमृता सिंहचा जन्म 1958 सालचा होता, तर सैफचा जन्म 1970 सालचा. म्हणजे अमृता सिंह सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. 1992 मध्ये बांधलेली लग्नगाठ 2004 साली तुटली आणि दोघेही 12 वर्षांच्या संसारानंतर वेगळे झाले
सैफचं पहिलं लग्न (1992) झालं तेव्हा करिना 12 वर्षांची होती. 1993 मध्ये सैफची मुलगी साराचा जन्म झाला. जेव्हा सैफ पहिल्यांदा बाप बनला, तेव्हा करिना 13 वर्षांची म्हणजेच आठवीत होती
इतकंच नाही, तर सैफच्या पहिल्या लग्नात 12 वर्षांच्या करिनानं हजेरीही लावली होती. विशेष म्हणजे त्याचं काँग्रॅच्युलेशन अंकल असं अभिनंदनही केलं होतं. नवाबच्या पहिल्या लग्नाची ही पहिली कहाणी. पण नवाबच्या आयुष्यात करिना कशी आली...
2006 साली टशन सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दोघेजण डेटिंग करत असल्याची कुजबूज सुरु झाली. लडाखमधल्या स्वीमिंग पूलमध्ये शर्टलेस बसलेल्या सैफला पाहून करिना घायाळ झाल्याचं तिनं मान्य केलं. करिनाच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या सैफनं आपल्या हातावर सैफिना असा टॅटूही काढला.
बरीच वर्षे लपून छपून प्रेमप्रकरण निभावणाऱ्या दोघांनी 2007 मध्ये मात्र खुल्लमखुल्ला ऐलान केलं. मनिष मल्होत्राच्या शोमध्ये दोघांनीही आपण प्रेमात असल्याची जाहीर कबुली अख्ख्या मीडियासमोर दिली आणि 2012 साली दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली.
संसारात रममाण झाल्यानंतरही करिना पडद्यापासून दूर गेली नाही पण पतौडी पॅलेसचा आबही तिनं लीलया राखला. दोन मुलांचा वडील असलेल्या सैफ आणि करीनाचं हे पहिलंच अपत्य आहे. सैफला अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.
करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. बाळ आणि आईची तब्येत सुखरुप आहे. जुलै महिन्यात सैफने आपण पिता होणार असल्याची घोषणा केली होती.
सकाळी 7.30 वाजता करीनाने मुलाना जन्म दिला. यावेळी पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर, बहिण करिश्मा कपूरसह दोन्ही कुटुंब उपस्थित होतं. गरोदर असूनही करीना कपूरने कामातून ब्रेक घेतलेला नव्हता. ती अनेकदा शूटिंग करत होती. तसंच ती अनेक पार्टींमध्येही दिसत होती.
त्याआधी करिना आणि सैफने लपून छपून गर्भलिंग परीक्षण केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. त्यावर ‘आम्हाला अद्यापही आमच्या होणाऱ्या बाळाचं लिंग माहित नाही,’ असंही सैफने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.
संबंधित बातम्या :
सैफ अली खानची मुलगी आणि सुशीलकुमार शिंदेंचा नातू
‘मी प्रेग्नंट आहे, मेली नाही’, करीना भडकली
मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement