एक्स्प्लोर

Sai Tamhankar : सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर; पोस्ट शेअर करत म्हणाली,"एक मैलाचा दगड गाठला"

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबईत स्वत:चं पहिलं घर खरेदी केलं आहे.

Sai Tamhankar New Home : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने आता मुंबईत (Mumbai) स्वत:चं पहिलं घर खरेदी (Sai Tamhankar New Home) केलं आहे. पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सांगलीची सई ताम्हणकर आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. अभिनेत्रीने नवं घर घेतलं असलं तरी जुन्या घरातून मात्र तिला पाय निघत नाही आहे. 

सई ताम्हणकर झाली मुंबईकर!

सई ताम्हणकर मुंबईकर झाली आहे. नव्या घराबद्दल चाहत्यांनी माहिती देत तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"माझं अकरावं घर...आज पुन्हा एकदा मनात भाती आणि उत्साह असून नव्या घरात पाऊल ठेवत आहे. खऱ्या अर्थाने आज एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबईतलं पहिलं घर घेतलं असून आज या घरात गृहप्रवेश करताना एक वेगळाच आनंद आहे. एक मैलाचा दगड गाठला आहे. घरासोबत प्रत्येकाच्या वेगळ्या आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येकासाठीच घर हे खूप खास असतात."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

सईने पुढे लिहिलं आहे,"या आनंदाक्षणी एक कडू आठवणदेखील शेअर करावीशी वाटतेय. माझं जुनं घर, त्याच्या त्या ओळखीच्या झालेल्या भिंती आणि जुन्या घराचा निरोप घेत आहे. एकेकाळी आराम केलेल्या घराचा आज निरोप घेत आहे. या घरातील प्रत्येक खोलीत आठवणी आहेत. कुजबूज, हास्याचे आवाज आणि गोष्टी..".

सई म्हणतेय,"आज एका नवीन अध्यायाला सुरुवात करत आहे. त्यामुळे कृतज्ञतेने भरुन आलंय. या घरातील आठवणी खूप काही शिकवणाऱ्या आहेत. या घराने मला स्वप्न पाहायला शिकवलं. त्यामुळेच आज अतिशय कृतज्ञतेने या घराचा निरोप घेत आहे आणि माझ्या हक्काच्या नव्या घरात पाऊल ठेवत आहे".

सईच्या पोस्टवर चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

सईच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहते कमेंट्स करत अभिनेत्रीचं अभिनंदन करत आहेत. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, नव्या घरासाठी खूप-खूप अभिनंदन, नव्या घरातही सकारात्मक आणि कलात्मक उर्जा निर्माण करणार. नवं घर तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी व भरभराट आणो, मुंबईकर सई, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. मराठी मनोरंजनसृष्टीची आघाडीची अभिनेत्री असणाऱ्या सईने मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमाने सईला खऱ्या अर्थाना लोकप्रियता मिळाली. आजवर सईने अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

संबंधित बातम्या

Kriti Senon: 'माझी सुंदरी...'; राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सईनं कृतीसाठी शेअर केली खास पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Embed widget