एक्स्प्लोर

Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....

Team India in Mumbai: विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे गुरुवारी मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. विश्वविजेत्या संघाला पाहण्यासाठी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे परिसरात अलोट जनसागर लोटला होता. वानखेडे स्टेडियमवर जोरदार सेलिब्रेशन.

मुंबई:  ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या टीम इंडियाचे गुरुवारी भारतात आगमन झाले होते. या विश्वविजयी संघाचे दिल्ली आणि मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) खेळाडू मुंबईत आले होते. मुंबईत पाऊल ठेवल्यापासून ते वानखेडे स्टेडियमवर जाईपर्यंत विश्वचषक स्पर्धेतील विजयाचे जोरदार सेलीब्रेशन करण्यात आले. या विश्वविजेत्या संघाला पाहण्यासाठी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे परिसरात अलोट जनसागर लोटला होता. 

भारतीय संघाची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. प्रचंड गर्दीमुळे ही बस अक्षरश: मुंगीच्या गतीने चालत वानखेडे स्टेडियमपर्यंत (Wankhede Stadium) पोहोचली. इतका विराट जनसागर पाहून भारतीय खेळाडूही हरखून गेले होते. क्रीडाचाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करताना सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते. यानंतर वानखेडे स्टेडियमवर एका छोटेखानी कार्यक्रमात भारतीय खेळाडुंचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रसारमाध्यमांशी मराठीत संवाद साधला. त्याने विश्वचषक जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, सगळ्यांना भरपूर खुशी आहे, कारण 17 वर्षानंतर ट्रॉफी आपल्या इंडियात आली आहे. त्यामुळे सगळ्यांना खुशी तर आहे.  यावेळी रोहित शर्माला ट्वेन्टी-20 फॉर्मेटमध्ये तू आणखी काही काळ खेळायला पाहिजे होते का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित म्हणाला, नाही, हा बरोबर टाईम होता, परफेक्ट टाईम होता. 2007 चा विश्वचषक पण स्पेशल होता, 2024 चा पण स्पेशल आहे. वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे, असे रोहित शर्माने म्हटले. 

रोहित शर्माचा वानखेडेवर गणपती डान्स

वानखेडे स्टेडियमवर विजयाचे सेलीब्रेशन करताना टीम इंडियाच्या खेळाडुंनी मैदानाला फेरी मारली. यावेळी एका ठिकाणी ढोलताशांचा आवाज ऐकल्यानंतर रोहित शर्माने ठेका धरत नाचायला सुरुवात केली. त्याच्यापाठोपाठ विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनीही नाचायला सुरुवात केली. हे दृश्य पाहण्यासारखे होते. वानखेडे मैदानातील क्रीडाचाहत्यांना या क्षणाचे साक्षीदार होता आले. वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विराट कोहलीने यावेळी चाहत्यांने खूप आभार मानले. 

आणखी वाचा

डोळ्यात आनंदाश्रू, पायऱ्यांवर रोहितची मिठी, 'तो' क्षण कधीच विसरणार नाही, किंग कोहली वानखेडेवर भावूक

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget