एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ठाकरे' सिनेमात बाळासाहेबांना 'या' अभिनेत्याचा आवाज
सध्या या चित्रपटाच्या डबिंगचं काम सुरु आहे. पण मराठीतील बाळासाहेबांचा आवाज कोण हा प्रश्न नक्कीच पडला आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांतून अस्सल शिवसैनिक रोमांचित व्हायचा तो त्यांच्या आवाजामुळेच. त्यांचे विचार आणि ते विचार पटवण्याची पद्धत लोकांना भावली म्हणूनच बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट झाले. बाळासाहेबांचा जीवनपट असलेल्या 'ठाकरे' सिनेमा लवकरच मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या डबिंगचं काम सुरु आहे. पण मराठीतील बाळासाहेबांचा आवाज कोण हा प्रश्न नक्कीच पडला आहे.
तर मंडळी, मराठीतल्या एका मोठ्या कलाकाराने ठाकरे सिनेमात बाळासाहेबांचा आवाज दिला आहे. नुकतंच त्याचं डबिंग करण्यात आलं. त्या कलाकाराचं नाव आहे... दोस्तो दिल थाम के बैठो.. नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असलेल्या 'ठाकरे' सिनेमात बाळासाहेबांसाठीचा मराठी भाषेतला आवाज दिला आहे, वन अॅंड ओन्ली सचिन खेडेकर यांनी....
आँ.... काय झालं.. भुवया का उंचावल्या तुमच्या? आता तुम्ही म्हणाल, सचिन खेडेकरांचा आवाज? बाळासाहेबांना? यह बात कुछ हजम नहीं हुई.. ते तर आहेच.. पण त्यामागेही काही कारणअसेल. खेडेकरांनी कदाचित वेगळा सूर लावला असेल.. कुणाला माहित. पिक्चर येईपर्यंत वाट पाहायची इतकंच आपल्या हाती.
खासदार संजय राऊत यांनी ठाकरे चित्रपटाची निर्मिती केली असून अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहेत. सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिका म्हणजेच बाळासाहेब साकारत आहे.
'ठाकरे' चित्रपटाचा सिक्वेल येणार
ठाकरे सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि ठाकरे सिनेमाचे निर्माता संजय राऊत यांनी ही माहिती दिली. दोन तास 10 मिनिटांचा हा पहिला भाग आहे. त्याचा सिक्वेल येणार आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात 1995 पर्यंतचा बाळासाहेबांचा जीवनपट दाखवणार आहे, असं संजय राऊत यांनी 'एबीपी माझा'च्या 'ब्रेकफास्ट न्यूज'मध्ये सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement