एक्स्प्लोर
बॉक्स ऑफिसवरील कमाईत ‘रुस्तम’ची ‘मोहंजोदारो’ला जबरदस्त टक्कर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमाने ओपनिंग दिवशीच एकूण 14 कोटी 11 लाख रुपये कमवले. तर हृतिक रोशनच्या ‘मोहंजोदारो’ सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 8 कोटी 87 लाखांची कमाई केली. समीक्षकांकडून ‘रुस्तम’चं कौतुक ‘रुस्तम’ सिनेमा वीकेंडला आणखी जबरदस्त कमाई करण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. चित्रपट समीक्षकांकडून अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत आणि प्रेक्षकांनीही अक्षयला चांगलीच सोबत दिल्याचं चित्र आहे. त्याचवेळी, हृतिक रोशनच्या ‘मोहंजोदारो’ सिनेमाला सातत्याने मिळणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांचा फायदाही ‘रुस्तम’ला होताना दिसतो आहे. ‘रुस्तम’ सिनेमा देशभरात 2 हजार 300 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला असून, एअरलिफ्ट आणि हाऊसफुल 3 च्या तुलनेत या कमी आहेत. मात्र, स्क्रीनच्या हिशोबाने पाहिल्यास ‘रुस्तम’ची पहिल्या दिवसाची कमाई अधिक आहे. कारण जास्त स्क्रीनवर रिलीज होऊनही एअरलिफ्ट सिनेमाने पहिल्या दिवसी केवळ 12.35 कोटी आणि हाऊसफुल 3 सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 15.02 कोटी रुपयांची कमाई केली होती. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित ‘मोहंजोदारो’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 8 कोटी 87 लाखांची कमाई केली. या सिनेमातून पूज हेगडे पदार्पण करत असून, हृतिक रोशनसारखा लोकप्रियतेचं मोठं वलय असलेला अभिनेताही यात आहे. मात्र, तरीही सिनेमाने पहिल्याच दिवशी म्हणावी तशी कमाई केल्याचं दिसत नाही.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष




















