Rohit Shetty : रोहित शेट्टीचं ओटीटीवर पदार्पण ; 'द घोस्ट हू बॉम्ब्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
रोहितची 'द घोस्ट हू बॉम्ब्स' (The Ghost Who Bombs) नावाची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Rohit Shetty : सध्या चित्रपटांबरोबरच ओटीटी प्लॅटफोर्मवरील वेब सीरिजला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा अनेक लोक ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती देतात. अनेक बॉलिवूडमधील दिग्दर्शक त्यांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करतायत. लवकरच संजय लीला भन्साळी यांचा हीरामंडी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा भव्य सेट ते फिल्मसिटीमध्ये तयार करत आहेत. तसेच रोहित शेट्टी (Rohit Shetty) देखील ओटीटीवर पदार्पण करत आहेत. रोहितची 'द घोस्ट हू बॉम्ब्स' (The Ghost Who Bombs) नावाची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रिपोर्टनुसार, बुधवारी (2 मार्च) रोहितनं त्याच्या या सीरिजची चर्चा करण्यासाठी एका मिटींगचे आयोजन केले होते. या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. सुशवंत प्रकाश सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत. या सीरिजच्या शूटिंगला 10 ते 15 मार्च दरम्यान होणार आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात रणवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या अनेक आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. शाहीद कपूरच्या फेक या वेब सीरिजचे शूटिंग देखील गेल्या वर्षी झाले. या सीरिजमध्ये शाहीद खोट्या नोटा तयार करणाऱ्या एका तरूणाची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा :
- Pawankhind : 'पावनखिंड' ला मिळालेल्या प्रतिसादावर चिन्मय मांडलेकरची भावनिक पोस्ट ; म्हणाला, 'आम्ही धन्य झालो!'
- Gangubai Kathiawadi : कोण आहे 'गंगूबाई काठियावाडी' मधील शांतनु महेश्वरी ? आलियासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत
- Majhi Tujhi Reshmigath : ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी...’, प्रेमाच्या धाग्याने विणली जाणार यश-नेहाची रेशीमगाठ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha