Majhi Tujhi Reshmigath : ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी...’, प्रेमाच्या धाग्याने विणली जाणार यश-नेहाची रेशीमगाठ!
Majhi Tujhi Reshmigath : आता नेहाने आपल्या यशवरील प्रेमाची कबुली दिली आहे. यामुळे आता या जोडीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार आहे.
Marathi Serial Update : छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या भरपूर चर्चेत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर, चिमुकली परी अर्थात मायरा वायकूळ देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. यशच्या प्रेमात असलेल्या नेहासाठी आता सगळं वातावरण गुलाबी झालं आहे.
आता नेहाने आपल्या यशवरील प्रेमाची कबुली दिली आहे. यामुळे आता या जोडीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार आहे. यशच्या रूपाने नेहाच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत नेहाचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. ‘नेहा’ साकारणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने याच लूकमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पाहा प्रार्थनाचा ‘गुलाबी’ लूक!
लवकरच प्रेक्षकांना यश-नेहाचा रोमँटिक सीन पाहायला मिळणार आहे. नुकतेच या सीनचे शुटिंग पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने मालिकेच्या कथेत पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे. परी आणि नेहा या दोघी माय-लेकी एकमेकींच संपूर्ण विश्व आहेत. मात्र, आता त्यांच्या या छोट्याशा विश्वात तिसऱ्या व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. यश देखील आता या कुटुंबाचा एक भाग बनणार आहे. प्रेमाच्या धाग्याने यश-नेहाची ही रेशीमगाठ विणली जाणार आहे. तेव्हा, आता या मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
हेही वाचा :
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- Pawankhind : दुसऱ्या आठवड्यातही 'पावनखिंड'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पाहा कलाकार काय म्हणतात...
- Ponniyin Selvan-1 : ऐश्वर्याच्या 'पोन्नियन सेलवन' ची रिलीज डेट जाहीर ; फर्स्ट लूक चर्चेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha