Rohit Pawar : 'आवडती अभिनेत्री कोण?'; रोहित पवार यांनी घेतलं 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव
नुकतीच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे राजाकारणामधील त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. रोहित पवार हे विविध मुलाखतींमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. नुकतीच रोहित पवार यांनी मराठी किडा या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. आवडती अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न रोहित पवार यांना या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला रोहित पवार यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
तुम्हाला कोणती हिरोईन आवडते का? असा प्रश्न रोहित पवार यांना मराठी किडा या युट्यूब चॅनलच्या मुलाखतमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत रोहित पवार म्हणाले, 'हो आवडते ना, आलिया भट्ट' त्यानंतर रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'तुम्ही कधी आलिया भट्टला भेटला आहात का?' या प्रश्नाचं उत्तर रोहित पवार यांनी 'नाही' असं दिलं.
रोहित पवरांना आलिया भट्ट आवडते, या वाक्याचा वापर जर विरोधकांनी केला तर? असाही प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. यावेळी रोहित पवार म्हणले, 'करुन तर बघा त्याला उत्तर काय द्यायचे ते मी देईल.' मराठी किडा या युट्यूब चॅनलच्या या मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवासाबद्दल देखील सांगितलं.
पुढे या मुलाखतीमध्ये रोहित पवार यांना विचारण्यात आलं,"लग्न झाल्यानंतर असं कधी वाटलं का की, 'बायको नाही तर आपण काही नाही" यावर रोहित पवार म्हणाले, "असं अनेक वेळा वाटतं, रोज-रोज वाटतं आणि असाही प्रश्न पडतो की माझ्यासारख्या व्यक्तीला जो सातत्याने बाहेर असतो कामात असतो, त्याला माझी बायको कशी हँडल करते. एकतर ती हाऊस वाईफ आहे. ती बाय चॉइस हाऊस वाईफ आहे. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. हाऊस वाईफ होणं सोपं नाही. सुट्टीच्या दिवशी एक तास तरी मुलांना हँडल करणं सोपं नाही. लाखो लोकांना हँडल करु शकतो पण मुलांना हँडल करणं सोपं नाही आणि हे काम ती रोज करते."
View this post on Instagram
रोहित पवार यांच्या सोशल मीडियावर पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. रोहित पवार हे त्यांच्या दौऱ्याचे तसेच कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :