Rohit Pawar : भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवा, रोहित पवारांचा रोख कुणाकडं?
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी निषेध केला आहे.
Rohit Pawar : श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. पण यानिमित्तानं महाराष्ट्रात (Maharashtra) होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Mla Rohit Pawar) यांनी व्यक्त केले. हिंमत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं असे रोहित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. श्री साईबाबा देव नाहीत असं वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra krishna shastri) यांनी केल्यानं साईभक्तांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं असे रोहित पवार म्हणाले.
श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 2, 2023
पण यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागलाय...
“You must not lose faith in humanity. Humanity is an ocean; if a few drops… pic.twitter.com/zkBs0bxFkW
जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करण्याचे काम सुरु
निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त वक्तव्य करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिल्याचे रोहित पवार म्हणाले. पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही. या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं आणि बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असे रोहित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले धीरेंद्र कृष्ण शास्त्री
शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलेले नाही. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे प्रत्येक सनातनी हिंदूचे कर्तव्य आहे. काही लोकांची साईबाबांवर श्रद्धा असेल. मला त्यांच्या भावना दुखवायच्या नाहीत. पण साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही', असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटलं आहे. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या: