(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kantara Day 4 Box Office Collection: ऋषभ शेट्टींच्या 'कांतारा' ची बॉक्स ऑफिसवर जादू; केली कोट्यवधींची कमाई
अनेक नेटकऱ्यांनी 'कांतारा' (Kantara) या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Kantara Day 4 Box Office Collection: दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि अभिनेते ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांच्या 'कांतारा' (Kantara) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जन थिएटरमध्ये रिलीज झाले. अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रपटाचं कौतुक केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करत आहे. जाणून घेऊयात चित्रपटाचं कलेक्शन...
‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबरला हिंदी भाषेत रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं एक कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 2.50 कोटी कमाई केली. तिसऱ्या दिवशी 3.50 कोटी तर 1.45 कोटी चौथ्या दिवशी कमाई या चित्रपटानं केली आहे. सोमवारी (17 ऑक्टोबर) या चित्रपटानं जवळपास 1.35 ते 1.55 कोटींची कमाई केली.
साऊथ अभिनेत्यांकडून ‘कांतारा’ चं कौतुक
KGF नंतर ‘कांतारा’ हा दुसरा कन्नड चित्रपट आहे, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. धनुष, प्रभास या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. धनुषने एका पोस्टमध्ये लिहिले होते, 'कांतारा... माइंड ब्लोइंग. हा चित्रपट जरूर पहा. ऋषभ शेट्टी, तुला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. होम्बल फिल्म्सचे अभिनंदन. चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन.’ 16 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाची आयुष्मान खुराणाच्या डॉक्टर जी या चित्रपटाबरोबर टक्कर झाली. पण डॉक्टर जी पेक्षा कांतारा या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे, असं म्हटलं जात आहे. KGF नंतर ‘कांतारा’ हा दुसरा कन्नड चित्रपट आहे, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
पाहा ट्रेलर
ऋषभ शेट्टी,सप्तमी गौडा,मानसी सुधीर, प्रमोद शेट्टी या कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या कलाकारांच्या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच चित्रपटाच्या कथानकाचं देखील अनेक जण कौतुक करत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: