Rishab Shetty : 'कांतारा'च्या कथेचा अभिनेता ऋषभ शेट्टीच्या बालपणाशी संबंध आहे; बालपणातील फोटो आला समोर
Rishab Shetty Kantara Movie : सिनेइंडस्ट्रीत आपली छाप सोडणाऱ्या ऋषभ शेट्टीचा कांताराच्या कथेचा अभिनेता ऋषभ शेट्टीच्या बालपणाशी संबंध आहे.

Rishab Shetty Kantara Movie : 'कांतारा' या (Kantara Movie) चित्रपटातून ऋषभ शेट्टीची (Rishab Shetty) बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. दूरदर्शी कथा सांगणारा, दिग्दर्शक आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून ऋषभ शेट्टीची (Rishab Shetty) ओळख आहे. त्याने आतापर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. सिनेइंडस्ट्रीत आपली छाप सोडणाऱ्या ऋषभ शेट्टीचा कांताराच्या कथेचा बालपणापासून संबंध असल्याचे सनमोर आले आहे.
एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख असलेल्या ऋषभ शेट्टीने अगदी लहान वयातच करिअरला सुरुवात केली. इयत्ता सहावीत असताना त्याने आपला कला क्षेत्रातील प्रवास सुरू केला. तेव्हापासून ऋषभ शेट्टी हा यक्षगानचा कट्टर अनुयायी झाला. या बद्दल बोलताना ऋषभ शेट्टीने सांगितले की, "एक कलाकार म्हणून माझा प्रवास सहावीपासून सुरू झाला. त्यावेळी मी यक्षगान केले. तेव्हापासून माझ्या भागातील लोककथा लोकांना सांगणे हे माझे स्वप्न होते, असेही त्याने सांगितले.
ऋषभ शेट्टीने 'कांतारा: द लिजेंड' या जगभरातील लोकप्रिय चित्रपटात लोककथा नृत्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. कांतारामधील नृत्य वराहरुपम ट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ इव्हेंटमध्ये ते थेट सादर करण्यात आले. 'कांतारा चॅप्टर 1' या प्रीक्वेलची घोषणा देखील करण्यात आली.
ऋषभ शेट्टी आपल्या संस्कृतीशी जोडलेला असल्याचे म्हटले जाते. ऋषभ कुठेही गेला तरी त्यांची संस्कृती आणि परंपरा पाळण्याची जाणीव ठेवतात. 'कांतारा' या चित्रपटाचा प्रीक्वेल असणारा 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
वर्षभरापूर्वी 'कांतारा' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. चित्रपटाची कथा, कलाकारांचा दमदार अभिनय या बळावर कांताराने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले.
इतर संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
