एक्स्प्लोर

Sushant Singh | अभिनेता सुशांत सिंह याच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना धक्का!

बॉलिवूडमधील एक चांगला हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे.या घटनेमुळे बॉलिवडूसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना धक्का बसला आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर असलेल्या मुलीने आत्महत्या केली होती. या घटनेवर बॉलिवूडसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.

सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशांतसिंग राजपूत. एक हरहुन्नरी अभिनेता खूप लवकर गेला. त्याने टीव्हीवर आणि चित्रपटांत उत्कृष्ट कामगिरी केली. मनोरंजन क्षेत्रात त्याने त्याच्या कामाने अनेकांना प्रेरित केलंय. त्याचंचांगलं काम नेहमीच मागे राहील. त्याच्या निधनाने मला धक्का बसलाय. माझ्या संवेदना त्याचे कुटुंबिय आणि चाहत्यांसमवेत आहेत. ओम शांती.

अभिनेता अक्षय कुमार

खरं तर या बातमीने मला धक्का बसला असून मी निशब्द झालोय. सुशांतचा छिचोरे हा चित्रपट पाहिल्यानंतर मी मित्र निर्माता साजिद याला फोन करुन सांगितले होते की कशा प्रकारे मी या चित्रपटाचा आनंद घेतला. सुशांत खरचं प्रतिभावान अभिनेता होता. देव त्याच्या कुटुंबियांना शक्ती देवो.

रेल्वे मंत्री पियुष गोयल सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल ऐकून वाईट वाटलं. तो एक तरुण, प्रतिभावान अभिनेता होता. ज्याने आपल्या करिश्माद्वारे रुपेरी पडदा झळालून टाकला. आपण आपल्या मानसिक आरोग्यास प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या प्रियजनांसोबत स्वत: ला व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहु नये. ॐ शांती:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यलय सुशांतसिंग राजपूत यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून आश्चर्यचकित झालो. देव त्यांच्या कुटुंब, चाहते आणि प्रियजनांना सामर्थ्य देईल.

खासदार सुप्रिया सुळे धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युची बातमी ऐकून धक्का बसला.त्याने अल्पावधीत चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.सशक्त अभिनय हे त्याचे बलस्थान होते.भावपूर्ण श्रद्धांजली. #sushantsinghrajpoot

माजी क्रिकेटर विनोद कांबळी सुशांत सिंहने आत्महत्या केल्याची ऐकून दुःख झालं. त्याने आत्महत्या केली यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्याने एमएस धोनी चित्रपटात केलेली भूमिक मला खूप आवडली होती. त्याला भावपूर्ण श्रद्धाजली.

माजी क्रिकेटर रवि शास्त्री सुशांत सिंहच्या जाण्याने मला मोठा धक्का बसलाय. त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील आजपर्यंतची सर्वात धक्कादायक बाब ठरली. तरुण आणि इतके आयुष्य समोर असताना असे का???

अभिनेत्री स्वरा भास्कर नाही नाही नाही! सुशांत सिंह राजपूत याची निधन झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे! शब्दांपलीकडे धक्कादायक आणि वाईट! गुडबाय सुशांत. तुम्ही इतके अप्रतिम कलाकार होतात. तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. तुझ्या जाण्याबद्दल मला दुःख आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी मी यावर अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. हे धक्कादायक आहे. एक सुंदर अभिनेता आणि चांगला मित्र, हे निराशाजनक आहे. तुझ्या आत्मला चिरशांती लाभो. कुटुंब आणि मित्रांना यातून बाहेर पडण्यास शक्ती दे.

केंद्रीय मंत्री स्म्रिती इराणी माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. आपण मार्ग का? सोडला याबद्दल काहीच समजत नाही. बालाजीला आलेल्या एका तेजस्वी मुलापासून ते एका यशस्वी स्टारपर्यंतचा तुझा प्रवास प्रेरणादायी आहे. तू मोठा पल्ला गाठला होता आणि अजून बरेच मैलांचे अंतर पार करायचे बाकी होते. तुझी आठवण येईल. सुशांतसिंगराजपूत खूप लवकर गेला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde : आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
आत्महत्या केलेल्या गणेश बडेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी घेणार, पंकजा मुंडेंनी केलं कुटुंबियांचं सांत्वन
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Embed widget