Ratan Tata Bollywood Film: रतन टाटांचा पहिला अन् शेवटचा सिनेमा; पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळला, नाव माहितीय?
Ratan Tata Bollywood Film: जगभरात टाटा समूहाचं नाव पोहोचवण्यात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या रतन टाटा यांनी चित्रपटसृष्टीतही आपलं नशीब आजमावलं. पण, चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला.
Ratan Tata First And Last Film: प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) हे देशातील एकमेव उद्योजक आहेत, जे आपल्या संपत्तीचा सर्वाधिक भाग गरजूंसाठी, अडअडचणीत सापडलेल्यांना मदत करण्यासाठी खर्च करायचे. रतन टाटा यांच्या साधेपणाच्या चर्चा तर नेहमीच रंगलेल्या असतात. टाटा उद्योग समूह जगभरात पोहोचवण्यात रतन टाटा यांनी मोलाचं योगदान दिलं. टाटा म्हणजे, विश्वास... हे वाक्य सर्वसामान्यांच्या मनात आणखी दृढ करण्यासाठी रतन टाटा आयुष्यभर झटले. अशातच, रतन टाटा यांनी चित्रपटसृष्टीतही आपलं योगदान दिलं, पण त्यांना फारसं यश मिळालं नाही.
20 वर्षांपूर्वी रतन टाटा यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या चित्रपटासाठी पैसे गुंतवले होते, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. एवढा की, या चित्रपटाच्या कमाईतून तो तयार करण्यासाठी लागलेलं बजेटही निघू शकलं नव्हतं. त्यानंतर मात्र, रतन टाटा यांनी चित्रपट सृष्टीतून काढता पाय घेतला. साधारणतः 20 वर्षांपूर्वी काढलेला चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.
रतन टाटा यांनी ज्या चित्रपटासाठी पैसे गुंतवले, त्याचं नाव काय?
विक्रम भट्ट यांनी अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू अभिनीत 'ऐतबार' या रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट 23 जानेवारी 2004 रोजी प्रदर्शित झाला होता. रतन टाटा यांच्या इन्फोमीडिया फिल्म प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपटाची कथा मनोरुग्ण प्रियकर (जॉन अब्राहम) आणि त्याची मैत्रीण (बिपाशा बासू) यांच्याभोवती फिरते. 'ऐतबार'मध्ये अमिताभ बच्चन यांनी बिपाशाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आपल्या मुलीला तिच्या मनोरुग्ण प्रियकरापासून वाचवण्याची त्यांची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली होती.
बॉक्स ऑफिसवर आपटला चित्रपट
बिग बी, जॉन आणि बिपाशा यांसारखे बॉलीवूड स्टार्सही 'ऐतबार' हिट करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत, चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 4.25 कोटींचा व्यवसाय केला आणि वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर केवळ 7.96 कोटींचा व्यवसाय केला. 'ऐतबार' बॉक्स ऑफिसवर आपलं बजेटही पूर्ण करू शकला नाही. चित्रपटाचं बजेट 9.50 कोटी रुपये होतं. अशा परिस्थितीत रतन टाटा यांचा चित्रपटावर खर्च झालेला पैसा आणि चित्रपटसृष्टीत प्रगती करण्याच्या त्यांच्या आशा या दोन्ही गोष्टी संपुष्टात आल्याचं काही जाणकार सांगतात. रतन टाटा यांनी आयुष्यात काढलेला चित्रपट 'ऐतबार' एवढा मोठा फ्लॉप ठरला की, रतन टाटा यांना पुन्हा कोणत्याही चित्रपटात पैसे गुंतवण्याचं धाडस झालं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पाकिस्तानात राहते Sridevi यांची 'तिसरी मुलगी'; आता सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी भारतात दाखल