एक्स्प्लोर
फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहूनही मलायकाची बहिण कमावतेय कोट्यवधी रुपये, अमृता अरोराचं गोव्यात आलिशान रेस्टॉरंट
Amrita Arora Goa Restaurant : अभिनेत्री अमृता अरोरा हिने गोव्यात आलिशान रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटची लोकेशन, इंटिरियर आणि मेन्यू सगळंच शानदार आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.

Amrita Arora Goa Restaurant Photos
1/9

Amrita Arora Restaurant in Goa : फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहूनही मलायकाची बहिण अमृता अरोरा कोट्यवधी रुपये कमावत आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहूनही ती लक्झरी लाईफ जगतेय, यामागचं कारण जाणून घ्या.
2/9

अमृता अरोरा फार कमी चित्रपटांमध्ये दिसली, पण ती कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अमृता तिच्या नवीन लॅव्हिश रेस्टॉरंटमुळे चर्चेत आली आहे.
3/9

अभिनेत्री अमृता अरोरा हिने तिच्या नवीन रेस्टॉरंटची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
4/9

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर अमृता अरोराने एक आलिशान रेस्टॉरंट सुरु केलं आहे. अमृताने पती शकील लडाक याच्यासोबत मिळून गोव्यातील अंजुना बीचवर हे आलिशान रेस्टॉरंट उघडलं आहे.
5/9

अमृताने या रेस्टॉरंटचं लोकेशन, इंटिरियर ते मेन्यू सर्वच बाबतीत खूप काटेकोरपणे लक्ष घातलं आहे. रेस्टॉरंटच्या आतील सजावटीपासून ते मेनूपर्यंत सर्व काही तिने चाहत्यांसह शेअर केलं आहे. प्रतिमा
6/9

गोव्यातील अंजुना समुद्रकिनाऱ्यावर अमृता अरोराने नव्याने उघडलेल्या नवीन रेस्टॉरंटचे नाव 'जोलीन' आहे. हे रेस्टॉरंट खूप सुंदर आणि आलिशान आहे. अमृता-शकीलचे हे आलिशान रेस्टॉरंट गोव्यातील सर्वात सुंदर बीच रेस्टॉरंटपैकी एक मानलं जातं, जिथे समुद्राचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.
7/9

अमृताने अलीकडेच तिच्या नवीन रेस्टॉरंटची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली. भव्य आणि आलिशान रेस्टॉरंटची झलक पाहूनच चाहते थक्क झाले आहेत. अमृताने तिचं रेस्टॉरंटच्या डेकोरेशनसाठी नैसर्गिक सौंदर्यावर भर दिला आहे, तिने रेस्टॉरंटच्या आतील बाजूसने लहान ताडाच्या झाडांनी सजवलं आहे.
8/9

अमृताच्या रेस्टॉरंटचा मेनूमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्थांची सोय केली आहे. भारतीय पाककृतींना एक नवीन टच देण्यात आला आहे. अमृताच्या रेस्टॉरंटचा मेनू सुवीर शरण यांनी अंतिम केला आहे.
9/9

अभिनेत्री अमृताच्या रेस्टॉरंटची जबाबदारी शेफ सुवीर सरन यांनी घेतली असून, ते या इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने शेफ विकास खन्ना यांच्यासोबतही काम केलं आहे.
Published at : 02 Feb 2025 01:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
कोल्हापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
