एक्स्प्लोर

पाकिस्तानात राहते Sridevi यांची 'तिसरी मुलगी'; आता सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी भारतात दाखल

Sridevi Third Daughter: श्रीदेवी यांच्या दोन मुलींबाबत आपण सर्वच जाणतो. एक जान्हवी कपूर आणि दुसरी खुशी कपूर. पण फार कमी लोकांना त्यांच्या तिसऱ्या मुलीबाबत माहिती आहे.

Sridevi Third Daughter: अनेक पाकिस्तानी (Pakistani Actress) सेलिब्रिटी भारतात आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी (Pakistani Celebrities) यापूर्वीही बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम केलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, आणखी एक पाकिस्तानी अभिनेत्री जिने यापूर्वीही हिंदी चित्रपटांमध्येही (Hindi Movies) काम केलं आहे, ती लवकरच भारतात परतणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही पाकिस्तानी अभिनेत्री बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची तिसरी मुलगी आहे. श्रीदेवी यांच्या दोन मुलींबाबत आपण सर्वच जाणतो. एक जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि दुसरी खुशी कपूर (Khushi Kapoor). पण फार कमी लोकांना त्यांच्या तिसऱ्या मुलीबाबत माहिती आहे.  श्रीदेवींची तिसरी मुलगी यंदा ती एका बड्या अभिनेत्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

2017 मध्ये श्रीदेवी यांच्या थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एका चित्रपटात या पाकिस्तानी अभिनेत्रीनं श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी तिनं अनेक लोकप्रिय पाकिस्तानी नाटकांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर तिचं नशीब पालटलं आणि थेट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं.

पाकिस्तानी अभिनेत्री, जी आहे Sridevi यांची 'तिसरी मुलगी'

आम्ही ज्या पाकिस्तानी अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिचं नाव 'सजल अली'. 2017 मध्ये सजलनं मॉम चित्रपटात श्रीदेवी यांची मुलगी आर्या सबरवालची भूमिका साकारली होती. सजलनं सिनफ-ए-आहान, इश्क-ए-ला, ये दिल मेरा, याकिन का सफर आणि कुछ अनकही यांसारख्या प्रसिद्ध पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण ही पाकिस्तानी अभिनेत्री खरंच श्रीदेवी यांची तिसरी मुलगी आहे का? जाणून घेऊयात... 

श्रीदेवी यांची तिसरी मुलगी पाकिस्तानात राहते 

एका मुलाखतीत बोलताना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी सजल अली माझी तिसरी मुलगी आहे, असं म्हटलं होतं. मॉस चित्रपट रिलीज झाल्यानंतर श्रीदेवी यांनी एक मुलाखत दिली होती, त्याच मुलाखतीत बोलताना त्यांनी सजल अलीला आपली तिसरी मुलगी म्हणून संबोधलं होतं. श्रीदेवी बोलताना म्हणालेल्या की, "मला आणखी एक मुलगी असल्यासारखं वाटतंय" दरम्यान, 2018 मध्ये श्रीदेवी यांचं निधन झालं. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबासोबत इंडस्ट्रीवरही दुःखाचा डोंगर कोसळला होता. श्रीदेवी यांच्या जाण्यानं सजलही दुःखी झाली होती. त्यावेळी बोलताना तिनं सांगितलेलं की, "2017 मध्ये माझ्या जन्मदात्या आईला गमावलं, पण मला श्रीदेवी यांच्या रुपानं पुन्हा आई भेटली होती. पण, आता पुन्हा एकदा माझ्याकडून माझी आई हिरावल्यासारखं वाटतंय."

पाकिस्तानी अभिनेत्रीनं केलेले चित्रपट

View this post on Instagram
 
A post shared by Sajal Ali (@sajalaly)

पाकिस्तानी अभिनेत्री म्हणजेच, सजल अली आणखी काही चित्रपटांचा भाग आहे. ज्यात 'जिंदगी कितनी हसीन है' आणि 'खेल खेल में' यांचा समावेश आहे. 2023 मध्ये, अभिनेत्रीनं हॉलिवूड चित्रपट व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट? मध्ये काम केलं. ज्यामध्ये लिली जेम्स, शझाद लतीफ, शबाना आझमी, एम्मा थॉम्पसन आणि असीम चौधरी यांच्याही भूमिका आहेत. सजल अली लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत फौजी नावाच्या चित्रपटात काम करणार आहे.

दरम्यान, मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2018 मध्ये, त्यांची मुलगी जान्हवी कपूरनं 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ज्यामध्ये ईशान खट्टर जान्हवीसोबत मुख्य भूमिकेत दिसलेला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget