एक्स्प्लोर
...म्हणून अक्षय कुमारसोबत सिनेमा करण्यास रणवीरचा नकार

मुंबई : बाजीराव मस्तानी सिनेमानंतर अभिनेता रणवीर सिंह यशाच्या शिखरावर आहे. रणवीरची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने एका सिनेमासाठी त्याला विचारणा केली. करणच्या या सिनेमात दोन अभिनेते असणार आहेत. त्यापैकी एका भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड झाली असून, दुसऱ्या भूमिकेसाठी रणवीरला विचारणा झाली. मात्र, रणवीरने थेट नकार दिला आहे.
ज्या सिनेमात अक्षय कुमारसारखा अभिनेता आधीपासूनच आहे, त्यात भूमिका करुन आपली वेगळी छाप पाडता येणार नाही, हे रणवीरला पुरेपूर कळून चुकलं आहे. त्यामुळे त्याने एकाच सिनेमात सहअभिनेता बनण्यास थेट नकार कळवला आहे, अशी सध्या चर्चा आहे.
सोलो हिरो सिनेमांकडे रणवीर सिंह सध्या अधिक लक्ष देतो आहे. जेणेकरुन स्वत:ची वेगळी छाप पाडता येऊ शकते. म्हणूनच अक्षय कुमारसोबतच्या सिनेमाला नकार दिल्याचं बोललं जात आहे.
खरंतर अभिनेता अक्षय कुमार रणवीर सिंहचा चाहता आहे. काही महिन्यांआधी एका पुरस्कार सोहळ्यात अक्षय कुमार आणि रणवीर एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी रणवीरने अक्षय कुमारचा लहानपणापासून चाहता असल्याचं नमूद केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
