Ram Setu OTT Release: अक्षयचा राम सेतू होणार ओटीटीवर रिलीज; कधी आणि कुठे पाहू शकणार चित्रपट? जाणून घ्या...
राम सेतू (Ram Setu) या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत स्ट्रीम केला जाणार आहे.
Ram Setu OTT Release: बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे सध्या चर्चेत आहे. 26 ऑक्टोबर रोजी त्याचा राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत स्ट्रीम केला जाणार आहे.
प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रेंट सर्व्हिसमध्ये राम सेतू हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर प्रेक्षक हे ओटीटीवर हा चित्रपट विनामूल्य रिलीजची वाट पाहत होते. आता आज (21 डिसेंबर) 'राम सेतू' चित्रपटाच्या विनामूल्य रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर 'राम सेतू'च्या मोफत ओटीटी रिलीजबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या 23 डिसेंबरपासून 'राम सेतू' अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर मोफत ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल.
View this post on Instagram
अक्षय कुमारचे 2022 मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही. सम्राट पृथ्वीराज, कटपुतली, रक्षाबंधन हे अक्षयचे चित्रपट फ्लॉप ठरले. अक्षयच्या राम सेतू चित्रपटाची निर्मिती 200 कोटीच्या बजेटमधून करण्यात आली. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राम सेतू चित्रपटातील VFX, चित्रपटाचं कथानक, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टीचं कौतुक केलं. राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग उटी, दमण- दीव आणि मुंबईच्या जवळ झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Ram Setu Box Office Collection: अक्षय कुमारची बॉक्स ऑफिसवर जादू नाहीच; जाणून घ्या राम सेतूचं कलेक्शन