एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
होळीला राम गोपाल वर्माचं पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्वीट
मुंबई : महिला दिनी अभिनेत्री सनी लिओनचा संदर्भ घेत दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्यावरुन उठलेला वादंग शांत होत नाही, तोच त्याने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. होळीच्या शुभेच्छा देताना पुन्हा एकदा त्याने हीन मानसिकतेचं दर्शन घडवलं आहे.
'होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात', असं ट्वीट राम गोपाल वर्माने केलं आहे. 'मला माहित नाही, कोणत्या देवाने कोणत्या राक्षसाचा वध केला, पण असे मादक क्षण निर्माण केल्याबद्दल मी राक्षसांचे आभार मानतो' असंही वर्माने म्हटलं आहे.
120 कोटी जनतेपैकी एकाला तरी होळी साजरा करण्याचं कारण माहित आहे का, मला शंका वाटते. पण सगळे भांग पितात, असंही त्याने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी त्याच्यावर टीकेचेच रंग पुन्हा उधळले जाण्याची शक्यता आहे.
'सनी लिओन जितका आनंद देते, तितकाच आनंद जगभरातील सर्व महिलांनी पुरुषांना द्यावा, अशी इच्छा आहे' असं ट्वीट राम गोपाल वर्मांनी केलं होतं. त्यावर आक्षेप घेत राम गोपाल वर्मांनी माफी मागावी, किंवा परिणामांना सामोरं जावं, कायदा हातात घेण्याचीही आमची तयारी आहे, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.
जागतिक महिला दिन साजरा होत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटरयुद्ध पेटलं होतं.
संबंधित बातम्या :
राम गोपाल वर्मांचं महिला दिनी वादग्रस्त ट्वीट
माफी मागा किंवा परिणामांना सामोरं जा, आव्हाडांचा वर्मांना इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement