Rakhi Sawant : राखी सावंतला अश्रू अनावर; पॅपराझींसमोर म्हणाली, "मला आई व्हायचं होतं, पण..."
Rakhi Sawant Video : राखी सावंतला पॅपराझींसमोर अश्रू अनावर झाले असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Rakhi Sawant On Adil Khan Durrani : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिलने राखीची फसवणूक केल्याने तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा पापसाझींसमोर राखीला अश्रू अनावर झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
राखी सावंतला पॅपराझींसमोर अश्रू अनावर
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राखी सावंत पॅपराझींसमोर तिची व्यथा मांडताना दिसत आहे. 'ड्रामा क्वीन' म्हणत आहे की,"आदिलने मला बाथरुमध्ये नेऊन मारलं आहे आणि हे देवाने पाहिलं आहे. त्याने माझा खूप छळ केला आहे. माझी खूप स्वप्नं होती. मला आई व्हायचं होतं, संसार करायचा होता. तसेच एक चांगली पत्नीदेखील होण्याची माझी इच्छा होती. पण माझी स्वप्न साकार होण्याआधीच त्याचे माझी फसवणूक केली".
आदिलला जामीन मिळू नये म्हणून राखी कोर्टातदेखील गेली होती. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली,"आदिलला जामीन मिळू नये यासाठी मी कोर्टात आली आहे. त्याने माझा छळ केला, फसवणूक केली आहे. त्यामुळे त्याला जामीन न मिळू देण्याची विनंती मी न्यायाधीशांकडे कली आहे. मी सर्व पुरावे पोलिसांना दिले आहे". आदिलचे विवाहबाह्य संबंध होते आणि ही गोष्ट त्याने आपल्यापासून लपवून ठेवली होती, असंही राखी म्हणाली.
View this post on Instagram
राखी सावंत पुढे म्हणाला,"आदिल माझा छळ करत असल्याने माझ्या आईला खूप त्रास व्हायचा. आदिलवर प्रेम का केलं आणि लग्न का केलं? यावरुन ती मला खूप ओरडायची. तिने आदिलला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मारहाणीनंतर माझ्या शरीरावरचे व्रण पाहून आईला खूप त्रास व्हायचा".
आदिल खान दुर्रानी पोलिसांच्या ताब्यात (Adil Khan Durrani Arrested)
अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. राखीनेच तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अभिनेत्रीच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आदिल खान दुर्रानीला ताब्यात घेतलं आहे. राखीने तिच्या आईच्या मृत्यूलाही आदिल जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या