एक्स्प्लोर
घरीच पहिली डेट अन् पहिलं KISS; दोन दिवस घराबाहेर पडले नव्हते अमृता-सैफ; मुलाखतीत सांगितला रंजक किस्सा
Amrita Singh Saif Ali Khan First Date : अमृता सिंह आणि सैफ अली खानच्या पहिल्या डेटचा किस्सा खूपच रंजक आहे. एका मुलाखतीत सैफने हा किस्सा सांगितला होता. तेव्हा तो चर्चेचा विषय ठरला होता.

Amrita Singh Saif Ali Khan First Date
1/11

Amrita Singh Birthday : अभिनेत्री अमृता सिंह हिचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 रोजी झाला. एकेकाळी अमृता सिंह तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. सौंदर्य, मोहक अदा आणि अभिनय कौशल्य याच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं.
2/11

अमृता सिंह 80 आणि 90 च्या दशकातील टॉपची अभिनेत्री होती. तिने अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं. यासोबतच तिची पर्सनल लाईफही खूप चर्चेत होती.
3/11

अमृता सिंह आणि सैफ अली खानचं नातं खूपच चर्चेत राहिलं. 32 वर्षीय अमृताने 12 वर्षांनी लहान सैफसोबत लग्न केल्याने एकच खळबळ उडाली होती. सर्वत्र याचीच चर्चा होती.
4/11

अमृता आणि सैफ च्या पहिल्या डेटचा किस्सा खूपच रंजक आहे. एका मुलाखतीत सैफने हा किस्सा सांगितला होता. तेव्हा तो चर्चेचा विषय ठरला होता.
5/11

अमृता सिंह आणि सैफ अली यांची पहिली भेट 'ये दिल्लगी' चित्रपटाच्या फोटोशूटवेळी झाली. तेव्हा अमृता सैफवर काहीशी नाराज होती.
6/11

फोटोशूटवेळी सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्यावेळी अमृता सुपरस्टार होती आणि सैफने इंडस्ट्रीमध्ये पदार्पणही केलं नव्हतं. सिनीयर असल्यामुळे सैफचं वागणं अमृताला खटकलं होतं.
7/11

एकदा सैफने अमृताला बाहेर जेवायला बोलावलं होतं. पण अमृताने त्याची ऑफर नाकारली. अमृताने सैफला सांगितलं की, तिला बाहेर फिरायला आवडत नाही. यानंतर, दोघेही अमृताच्या घरी भेटले आणि दोघेही दोन दिवस अमृताच्या घरी राहिले होते.
8/11

सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये सैफने अमृतासोबतच्या त्याच्या पहिल्या डेटबद्दलचा एक मनोरंजक किस्सा शेअर केला.
9/11

म्हणाला, 'जेव्हा मी अमृताच्या घरी पोहोचलो तेव्हा ती तिचा मेकअप काढत होती. तिला मेकअपशिवाय पाहून मी चकित झालो..
10/11

लग्नानंतर हे जोडपे मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान यांचे पालक झाला. पण 13 वर्षांच्या लग्नानंतर, 2004 मध्ये, सैफ आणि अमृता यांनी घटस्फोट घेतला.
11/11

सैफ आणि अमृता यांनी 1991 मध्ये त्यांच्या कुटुंबियांना न सांगता लग्न केलं. सैफ मुस्लिम आणि अमृता शीख धर्मीय होती. लग्नावेळी अमृता 32 वर्षांची होती आणि सैफ फक्त 20 वर्षांचा होता.
Published at : 09 Feb 2025 09:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
